jacqueline fernandez : जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांना २४ मार्च रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.


किम फर्नांडिस या मलेशियन आणि कॅनेडियन वंशाच्या होत्या. त्यांनी १९८० च्या दशकात, बहारीनमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले होते. हे काम करत असताना त्यांची ओळख श्रीलंकन बर्गर वंशाच्या एलरॉय फर्नांडिस यांच्याशी झाली, ज्यांनी श्रीलंकेतील यादवी संघर्षामुळे बहरीनमध्ये स्थलांतर केले होते. नंतर किम आणि एलरॉय यांनी लग्न केले. जॅकलिन ही त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान आहे. जॅकलिनला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.



आईच्या आजारपणामुळे, जॅकलिनने तिच्या सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तिच्या शुश्रूषेसाठी वेळ दिला. तिने गुवाहाटी येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभातील आपले नियोजित सादरीकरण रद्द केले होते.


जॅकलिनने तिच्या आईबद्दल पूर्वीच्या मुलाखतीत सांगितले होते की, "माझी आई नेहमीच माझे समर्थन करत होती. मी तिला खूप मिस करते. मी येथे माझ्या पालकांशिवाय एकटी राहते. ते दोघे खूप मजबूत आहेत आणि माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत, जे मला नेहमी पुढे जाण्यास प्रवृत्त करते.


जॅकलिन फर्नांडिसने २००९ मध्ये सुजॉय घोष यांच्या फॅन्टसी अ‍ॅक्शन कॉमेडी अलादीन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने साजिद खानचा २०१० चा अ‍ॅन्सेम्बल कॉमेडी 'हाऊसफुल', मोहित सुरीचा २०११ चा रोमँटिक थ्रिलर 'मर्डर २', साजिदचा २०१२ चा कॉमेडी 'हाऊसफुल २', अब्बास-मस्तानचा २०१३ चा अ‍ॅक्शन थ्रिलर 'रेस २', साजिद नाडियाडवालाचा २०१४ चा अ‍ॅक्शन कॉमेडी 'किक', साजिद-फरहादचा २०१६ चा कॉमेडी 'हाऊसफुल ३' आणि डेव्हिड धवनचा २०१७ चा कॉमेडी 'जुडवा २' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनू सूद यांच्या दिग्दर्शनात 'फतेह' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. लवकरच जॅकलिन तरुण मनसुखानीच्या'हाऊसफुल ५' या कॉमेडी चित्रपटात आणि अहमद खानच्या 'वेलकम टू द जंगल' या अ‍ॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

Comments
Add Comment

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.