भल्या पहाटे गायमुखजवळ ट्रकची बेस्ट बसला धडक! रस्त्यावर काचेचा खच

ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात भल्या पहाटे ट्रक आणि मिजी बसचा अपघात झाला. ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि बाजूने जाणाऱ्या मिनी बसला धडकून पलटी झाला. गुजरातवरून हा ट्रक रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. या अपघातामुळे येथे जड अवजड वाहनांची काही तास कोंडी झाली होती.



गुजरात ते मुंबई अशी वाहतूक करणारा ट्रक (GJ 02 VV 3808) मंगळवारी पहाटे ३:०० च्या सुमारास गायमुख घाटाजवळ वाहतूक चौकीच्या बाजूला पलटला. ट्रकमध्ये असलेल्या दारूच्या काचेच्या रिकाम्या रस्त्यावर पसरल्याने सगळीकडे काचांचा खच पडला होता. जवळच चौकीत असलेले वाहतूक पोलिस जयदत्त मुंढे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवून अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. लागलीच या विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन हायड्रा मशीन आणि जेसीबीच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.


या अपघातात मुलुंड आगाराच्या बसला देखील (MH 01 EM 3914) ट्रकची धडक बसली होती. त्यात बसचे किरकोळ नुकसान झाले. तर ट्रकची बॉडी पूर्णपणे सडल्याने तो बाजूला करण्यासाठी बराच वेळ लागला. सुदैवाने मुलुंड मिरा रोडच्या मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी संभाव्य हानी टळली. परंतु बस वाहक (कंडक्टर) हर्षल कासकर, वय ३२ यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली. काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला. अपघाताच्या घटनेमुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सुमारे तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीत सापडलेला रस्ता सकाळी ६-७ वाजता मोकळा झाला.

Comments
Add Comment

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि

व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले

Crime News : खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; दोन अल्पवयीनांसह चौघांना बेड्या

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १४

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! CSMT नंतर आता ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर 'डीमार्ट'तर्फे अत्याधुनिक आणि झक्कास स्वच्छतागृहे सुरू

मुंबई : प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

नायगाव लोकलमधील छेडछाड प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; महाराष्ट्र पोलिसांना 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून खाली ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणीच्या प्रकरणाची

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या