India vs Bangladesh : भारताने बांगलादेशला दिला जबर झटका

नवी दिल्ली : भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांचा समुद्राशी थेट संपर्क नाही. ही राज्ये समुद्रासाठी बांगलादेशवर अवलंबून आहेत. या भागात चीनला गुंतवणुकीची संधी आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य बांग्लादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केले. चीन दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बांगलादेशची कोंडी करायला सुरुवात केली आहे. याआधी शेख हसिना सरकार असताना भारतीय विमानतळ, बंदर, रेल्वे आणि महामार्ग वापरुन बांगलादेशला आयात - निर्यात व्यापार करायला परवानगी होती. आता ही परवानगी काढून घेण्यात आली आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद झाल्यामुळे बांगलादेशच्या आयात - निर्यात व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.



भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम विभागाने एक परिपत्रक काढून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद केल्याचे जाहीर केले आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसची परवानगी देणारे २९ जून २०२० चे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे नव्या परिपत्रकात नमूद आहे.



भारताकडून मिळालेल्या ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसमुळे बांगलादेश आतापर्यंत भूतान, नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी थेट व्यापार करू शकत होता. हा व्यापार आता अडचणीत सापडणार आहे.
Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी