Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा केसरी २ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला 'केसरी २' चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने 'केसरी २' चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रजांविरुद्ध लंडनच्या कोर्टात लढलेली कायदेशीर लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.



'केसरी चॅप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' हा ऐतिहासिक कोर्टरूम ड्रामा आहे. करण सिंग त्यागी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. धर्मा प्रॉडक्शन , लिओ मीडिया कलेक्टिव्ह आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन करण सिंग त्यागी आणि अमरितपाल सिंग बिंद्रा यांनी केले आहे. चित्रपटाचे संवाद सुमित सक्सेना यांनी लिहिले आहेत. 'द केस दॅट शूक द एम्पायर' या रघू पलट आणि पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित असलेल्या केसरी २ चित्रपटाचे निर्माते हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्व मेहता, अमरितपाल सिंग बिंद्रा हे आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण देबोजीत रे यांनी केले आहे.



'केसरी २' चित्रपटात अक्षय कुमार, आर. माधवन, अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नितीन बैद यांनी चित्रपटाचे एडिटिंग केले आहे. शाश्वत सचदेव यांनी या चित्रपटाला संगीताचा साज चढवला आहे. चित्रपटाचे वितरण धर्मा प्रॉडक्शनने केले आहे. हा १३५ मिनिटांचा हिंदी भाषेतील चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी