गायिका सोनू कक्करचे 'सिबलिंग डिवोर्स' : बहीण नेहा आणि भाऊ टोनीशी तोडले नाते, पण का?

मुंबई : लोकप्रिय गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं. सोनूच्या या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला आहे.


गायिका सोनू कक्करने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की, यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिक वेदनांमधून मी हा निर्णय घेतला आहे आणि आज मी खरोखरच निराश आहे",अशी पोस्ट केली. पण, काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. पण तिच्या या पोस्टनंतर 'सिबलिंग डिवोर्स' हा शब्द चर्चेत आला आहे. पती-पत्नीमधील घटस्फोटाबद्दल सर्वांनी ऐकलंच आहे. पण, 'सिबलिंग डिवोर्स' काय आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.



'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे काय?


जेव्हा भावंडांमधील नाते बिघडते किंवा ते एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात, तेव्हा हे भाव दर्शवण्यासाठी 'सिबलिंग डिवोर्स' ही संज्ञा वापरतात. 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे ज्यात भाऊ आणि बहिणींचे एकमेकांशी कोणतेही नाते नाही. हा कायदेशीर शब्द नाही. सोनू कक्करच्या पोस्टनंतर नेहा आणि टोन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या सगळ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय?


दरम्यान बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी सोनूचा अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय. सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर ही तिन्ही भावंड उत्तम गायक आहेत. नेहा आणि टोनी या दोघांसोबत तिने अनेक गाणी गायली आहेत. तर सोनू अनेक गायनाच्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहिली आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : "आम्ही पण मुंबईकर"! परळच्या चिटणीस कुटुंबाचा देखावा; समुद्री जीवांच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवातून हाक

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी आणि गजबजलेले रस्ते! पण याच

IIT Bombay Student Death : परीक्षेदरम्यान चॅटजीपीटी वापरल्याचा प्रकार; विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये आंदोलन

मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय

Disha Salian Case : सतीश सालियन मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दिशा सालियन

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाचा घाला; रांगेतच प्राण सोडल्याने हळहळ

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. मात्र,

IoT Water Meter : पाण्याची हातोहात होणारी चोरी येणार उघड; टँकर भरणा केंद्रावर बसवणारी आयओटी आधारीत इनलाइन अल्टासॉनिक जलमापके

प्रत्येक नोंदीची माहिती एक्वा सर्व्हरला मिळणार त्वरीत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या विविध ठिकाणी

BMC health report : मुंबईत यंदा मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ; डेंग्यू-चिकुनगुनियाला मात्र आळा पालिकेचा अहवाल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई यंदा मलेरियाच्या आजाराने डोकेवर काढले असून मागील वर्षीच्या ९ महिन्यातील