Diwali 2026 : मुंबई पोलिसांचा मध्यरात्री 'सर्जिकल स्ट्राईक'; फटाके फोडणाऱ्यांविरोधात 80 हून अधिक गुन्हे दाखल!

दिवाळीच्या सणात नियम धाब्यावर बसवून फटाके फोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट दखल घेत पोलिसांनी शहरभरात 80 हून अधिक एफआयआर नोंदवले असून, खार, काळबादेवी आणि मलबार हिलसह अनेक भागांत कठोर पावले उचलली आहेत.

मुंबई : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना आणि वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या निवासी भागात नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरभरात आतापर्यंत 80 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. फटाक्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.


या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस केवळ नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहत नसून, रात्रीच्या गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात स्वतःहून कारवाई करत आहेत. सार्वजनिक रस्ते आणि दाट लोकवस्तीच्या भागात फटाके फोडल्याने पादचारी, वाहनचालक आणि आसपासच्या इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन गस्तीवरील पोलीस पथके रात्रभर सतर्क आहेत.


अशीच एक कारवाई खार पोलिसांनी गुरुवारी पहाटे केली. खार पश्चिम येथील 20 व्या रोडवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास फटाके फोडणाऱ्या अक्षय जाधव या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बीट मार्शल कॉन्स्टेबल चेतन गायकवाड (वय 41) रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना हा प्रकार आढळून आला. मध्यरात्री फटाके फोडल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत होता. तसेच, वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधित तरुणाला नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांनी सांगितले की, "शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत फटाक्यांबाबत तक्रारी येत आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांवर पोलीस स्वतःहून लक्ष ठेवून गुन्हे नोंदवत आहेत."






मुंबईच्या विविध भागांत अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 9 नोव्हेंबर रोजी काळबादेवी येथील सार्वजनिक रस्त्यावर 3 रॉकेट फोडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अविनाश साहा (वय 34) याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. यातील 2 रॉकेट थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडकले, तर तिसरे रॉकेट एका इमारतीच्या भिंतीवर जाऊन आदळले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.


11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मलबार हिल पोलिसांनी नेपियन सी रोडवरील सार्वजनिक रस्ता आणि पदपथावर फटाके फोडल्याप्रकरणी कृष्णा ढेबे (वय 45) आणि अभय घडशी (वय 36) यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, 4 ते 9 नोव्हेंबरदरम्यान दादर, कुर्ला, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई करून गुन्हे नोंदवले आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांची नजर कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Rashi bhavishya : 12 राशींचे आजचे भविष्य! शनिवारी कोणाचे नशीब चमकणार?

आज शनिवार, 14 नोव्हेंबर 2026. काही राशींच्या व्यक्तींना रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक

केईएम रुग्णालयातील लिफ्ट समस्या लवकर सोडवणार; आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची ग्वाही

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजे एडवर्ड स्मारक अर्थात के. ई. एम. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार केंद्राची लिफ्ट बंद

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनासाठी महापालिका सज्ज; महापौर रितू तावडेंचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त

BMC Hospital : महापालिकेचे भगवती रुग्णालय पी.पी.पी तत्वावर... आमदारांनी नागरिकांसह घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईची वाढती लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांवरील वाढता रुग्णसेवेचा ताण लक्षात

दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांचा डल्ला! बंद घराची खिडकी तोडून चोरांनी लांबवले सोन्याचे दागिने

मुंबई: दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर गावी जात असतात. याचाच फायदा घेत, मुंबईतील चुनाभट्टीमध्ये

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर