Saie Tamhankar : 'आलेच मी' म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.



या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “'देवमाणूस' मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”



'आलेच मी' हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे. लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Barpeta artisans Ramayana armor : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाशी आसामचे खास कनेक्शन; बार्पेेटाच्या कुशल कारागिरांनी साकारले अभिनेत्यासाठी खास चिलखत!

दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर बहुचर्चित 'रामायण'

Dhvani Bhanushali : गायिका ध्वनी भानुशालीच्या आयुष्यात नवा अध्याय; प्रियकर यशसोबत उरकला साखरपुडा!

गायिका ध्वनी भानुशालीने शुक्रवारी तिचा प्रियकर यश भानूशालीसोबत साखरपुडा (Dhvani Bhanushali Engagement) झाल्याची घोषणा केली. तिने

Miranda Warning Movie: सस्पेन्स, संशय आणि हत्येचं रहस्य! ‘मिरांडा वॉर्निंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा चित्रपटप्रकार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द