गायिका ध्वनी भानुशालीने शुक्रवारी तिचा प्रियकर यश भानूशालीसोबत साखरपुडा (Dhvani Bhanushali Engagement) झाल्याची घोषणा केली. तिने इन्स्टाग्रामवर प्रपोजलचे सुंदर फोटो शेअर केले असून त्यामध्ये दोघेही तो खास क्षण आनंदाने साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो समोर आल्यापासून ध्वनीचा होणारा नवरा कोण आहे आणि त्यांची प्रेमकथा कधी सुरू झाली याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या गायिकेने अचानक तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
कोण आहे ध्वनी भानुशालीचा होणारा नवरा यश भानुशाली?
ध्वनी भानूशालीने यशसोबत जवळपास सात वर्षे डेटिंग केले, त्यानंतर आता त्यांनी आपले नाते अधिकृत केले आहे. यश भानुशालीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तो एक व्यावसायिक आणि 'ओरांगुटान इंडिया या गेमिंग आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा संस्थापक आहे. तो प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतो, त्यामुळेच गेली काही वर्षांत त्यांच्या नात्याची फारशी चर्चा झाली नाही.
ध्वनी आणि यशची प्रेमकथा कधी सुरु झाली याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही, परंतु सोशल मीडियावरील त्यांच्या जुन्या फोटोंवरून असे सूचित होते की, ते सुमारे सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ध्वनी भानुशालीने यशसोबतचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला आपल्या आयुष्यातील 'कपकेक' म्हटले आहे. ते दोघे एकत्र खूपच गोड दिसत आहेत. तलावाकाठच्या सुंदर सूर्यास्ताच्या वेळी झालेल्या त्यांच्या प्रपोजलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो समोर आले असले तरी गायिकेने त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पोस्ट टाकल्यानंतर काही क्षणांतच चाहते आणि गायिका सुकृती कक्कर आणि असीस कौर यांच्यासह सहकारी कलाकारांच्या अभिनंदनाच्या संदेशांनी कमेंट्स विभाग भरून गेला.