saif ali khan: अभिनेता सैफ स्टेजवर येताच घाबरला, पण मग हसला, नक्की काय घडलं?

मुंबई : 'ज्वेल थीफ' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत एक विचित्र घटना घडली. तो स्टेजवर खुर्चीवर बसायला गेला आणि त्याला काही तरी टोचले. अचानक काहितरी टोचल्याने घाबरलेला सैफ जोरात ओरडला. तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळे प्रेक्षक घाबरले. पण काही क्षणातच सैफला त्याची चूक लक्षात आली आणि तो स्वत:च जोरात हसला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला.



अभिनेता सैफ अली खान सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे. आता तो त्याच्या नवीन चित्रपटासाठी परत एकदा तयारीनिशी प्रेक्षकांसमोर आला आहे.


‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावतने याआधी करीना कपूरसोबत काम केलं होतं. आता तो सैफ अली खान सोबत काम करत आहे. या चित्रपटाचे नाव 'ज्वेल थीफ' आहे. सोमवारी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचच्या दरम्यान सैफसोबत विचित्र घटना घडली.


सैफच्या हातात एक लाल हिरा दिसला. सुरुवातीला, प्रमोशनदरम्यान सैफने तो हिरा सर्वांना दाखवला आणि हि-यासोबत फोटो काढताना भरपूर पोझही दिल्या. पोझ दिल्यानंतर, त्याने तो हिरा त्याच्या जीन्सच्या मागच्या खिशात ठेवला.


त्यानंतर तो स्टेजवर गेला आणि खुर्चीवर बसायला लागला तेव्हा तो हिरा त्याला टोचला आणि तो दचकून जोरात ओरडला. चाकू हल्ल्यामुळे आधीच चर्चेत असलेला सैफ ओरडल्याने सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. पण त्यानंतर त्याच्यासह सर्वांच्याच जेव्हा खरा प्रकार लक्षात आला तेव्हा सगळे जोरजोरात हसायला लागले. या प्रसंगाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी