Rohit Sharma : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!

वानखेडे स्टेडियममधील स्टँडला असणार रोहित शर्माचं नाव


मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यासह माजी महान भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत. आता या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नावही जोडले जाणार आहे.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्माच्या नावावर एक स्टँड असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहित शर्माच्या स्टँडला नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मंगळवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आणखी दोन स्टँडला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचेही नाव देण्यात येणार आहे. 'बैठकीत स्टँडच्या नावाला एकमताने मान्यता मिळाली असल्याचे क्रिकेट संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.



मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्रँड स्टँड लेव्हल ३ ला शरद पवार स्टँड नाव दिले जाईल. तर ग्रँड स्टँड लेव्हल ४ ला अजित वाडेकर स्टँड असे नाव दिले जाईल. दिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ ला रोहित शर्मा स्टँडचे नाव दिले जाणार आहे. २०११ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करणाऱ्या वानखेडेवर आधीपासूनच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आहेत. लवकरच रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे अनावरण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! CSMT नंतर आता ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर 'डीमार्ट'तर्फे अत्याधुनिक आणि झक्कास स्वच्छतागृहे सुरू

मुंबई : प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

नायगाव लोकलमधील छेडछाड प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; महाराष्ट्र पोलिसांना 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून खाली ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणीच्या प्रकरणाची

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील नजर आता अधिक तीक्ष्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या महापालिका आपत्कालिन नियंत्रण

Diwali 2026 : मुंबई पोलिसांचा मध्यरात्री 'सर्जिकल स्ट्राईक'; फटाके फोडणाऱ्यांविरोधात 80 हून अधिक गुन्हे दाखल!

मुंबई : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना आणि वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांच्या

Rashi bhavishya : 12 राशींचे आजचे भविष्य! शनिवारी कोणाचे नशीब चमकणार?

आज शनिवार, 14 नोव्हेंबर 2026. काही राशींच्या व्यक्तींना रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक