PM Modi Spoke to Elon Musk : पंतप्रधान मोदी आणि एलोन मस्क यांच्या फोन कॉल्स नंतर भारतात टेस्ला येण्याचे संकेत

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते अनेक नवीन माणसांना भेटतात अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात. फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात, ट्रम्प यांच्यासोबत, ते मस्क यांनाही भेटले. त्यानंतर आज (दि १८) पंतप्रधान मोदी यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलाॅन मस्क यांच्याशी फोनवर चर्चा केली.



या संभाषणात दोघांनीही भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून देत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या संभाषणात, भारतातील वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्र आणि मस्क यांच्या कंपन्यांमधील वाढत्या सहकार्यावरही विशेष लक्ष देण्यात आले. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टवर माहिती देत याबद्दल सांगितले आहे.





सोशल मीडियावर पोस्ट करत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


"मी मस्क यांच्याशी बोललो आणि या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसीमध्ये भेटलेल्या मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या प्रचंड क्षमतेवर आम्ही चर्चा केली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे."

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर