१ मेपासून पुणे, नवी मुंबई-मुंबई प्रवास होणार सुसाट!

ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे काम पूर्ण


मुंबई : ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे अर्थात पुणे, नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या मार्गिकेचे १ मे रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी होणार असून पुणे, नवी मुंबई - मुंबई प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे.


मुंबई आणि नवी मुंबईला रस्ते मार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल कार्यान्वित आहेत. पहिला ठाणे खाडी पूल १ आणि दुसरा ठाणे खाडी पूल-२. १९७३ मध्ये ठाणे खाडी पूल - १ बांधण्यात आला असून या दोन पदरी खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते. याच ठाणे खाडी पुलापासून २२ मीटर अंतरावर १९९४ मध्ये ठाणे खाडी पूल-२ बांधण्यात आला. या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे ठाणे खाडी पूल-२ वरील भार दिवसेंदिवस वाढत आहे.



वाहनांची संख्या वाढत असल्याने आता या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या पुलांवरील भार कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएसीने एकूण १.८३७ किमी लांबीचा तीन-तीन पदरी आणि ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्याचा निर्णय घेतला. ७७५.५७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामास २०२० मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना संकट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण कोरोना संकट टळल्यानंतर एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील उत्तरेकडील बाजू अर्थात मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नायगाव लोकलमधील छेडछाड प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; महाराष्ट्र पोलिसांना 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून खाली ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणीच्या प्रकरणाची

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील नजर आता अधिक तीक्ष्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या महापालिका आपत्कालिन नियंत्रण

Diwali 2026 : मुंबई पोलिसांचा मध्यरात्री 'सर्जिकल स्ट्राईक'; फटाके फोडणाऱ्यांविरोधात 80 हून अधिक गुन्हे दाखल!

मुंबई : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना आणि वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांच्या

Rashi bhavishya : 12 राशींचे आजचे भविष्य! शनिवारी कोणाचे नशीब चमकणार?

आज शनिवार, 14 नोव्हेंबर 2026. काही राशींच्या व्यक्तींना रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक

केईएम रुग्णालयातील लिफ्ट समस्या लवकर सोडवणार; आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची ग्वाही

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजे एडवर्ड स्मारक अर्थात के. ई. एम. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार केंद्राची लिफ्ट बंद