श्रीनगर येथे पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2025
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. संजय लेले आणि दिलीप देसले (पनवेल) यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मुंबईसाठी श्रीनगर येथून उड्डाण करणार आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी ६ वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान १ वाजून १५ मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. मी स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून सर्वांशी समन्वय…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 23, 2025






