Samantha Ruth: 'या' चाहत्याने, दक्षिणेतील अभिनेत्री समंथा रुथचे चक्क मंदिर उभारलं

मुंबई: भारतातील दक्षिणेतील सिनेकलाकार तिथल्या जनतेच्या मनात बसतात. त्याची क्रेझ एव्हडी आहे की काही दक्षिणेतील सिनेकलाकार मुखमंत्री झाले आहेत. म्हणजेच दक्षिणे तील जनता सिनेकलाकारांवर भरभरुन प्रेम करताना दिसली आहे. याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे.


अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे. 28 एप्रिल रोजी अभिनेत्री समांथा रुथने तिचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनीही समंथाचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सामंथाचे मंदिर दिसत आहे. या चाहत्याने या मंदिरात अभिनेत्रीचा 38 वा वाढदिवस साजरा केला. व्हिडिओमध्ये मंदिराबाहेर 'समंथाचे मंदिर' असे लिहिलेले दिसत आहे. आत प्रवेश केल्यावर सामंथाचे दोन पुतळे दिसतात; त्यापैकी एक सोनेरी रंगाचा आहे.



त्या चाहत्याने अभिनेत्रीसाठी केवळ मंदिरच बांधले नाही तर अनाथ मुलांसाठी एक पार्टी देखील आयोजित केली. अनाथ मुलांसोबत सामंथाच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. हे मंदिर बांधणाऱ्या चाहत्याचे नाव तेनाली संदीप आहे. या चाहत्याने माध्यमांशीही संवाद साधला. तेनाली म्हणाला, 'मी आंध्र प्रदेशचा आहे. मी सामंथाचा खूप मोठा चाहता आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मी काही वर्षांपूर्वी हे मंदिरही बांधले होते. दरवर्षी मी सामंथाच्या वाढदिवसाला मुलांना खायला घालतो आणि केक कापतो. समंथाने मला खूप प्रेरणा दिली आहे.


अभिनेत्री समांथाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ती 'सिटाडेल हनी बनी' या वेब सिरीजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवन देखील होता. ती 'ब्रह्मांड' ही वेब सिरीज देखील करत आहे. निर्माती म्हणून, समंथाचा एक चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.