ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरु होणार - प्रताप सरनाईक

ठाणे : ठाणे शहरात हवाई (पॉड) टॅक्सीच्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था सुरु होत आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेणे व सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला (Nutron EV mobility LTD) ठाणे महापालिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.


ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या पुढे गेली आहे. राज्यात नागरिकांना सर्वाधिक वेग ठाणे शहरामध्ये आहे. सहाजिकच भविष्यात रस्ते वाहतूकीला अनेक मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई (पॉड) टॅक्सी चा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाणे शहरात मेट्रो मार्गीकेचे जाळे देखील विकसित होत आहे.वडाळा ते गायमुख पुढील वर्षी सुरू होणे प्रस्तावित आहे. ठाणे शहरातील कापुरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीने हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून सुलभ आणि सुरक्षित हवाई टॅक्सी ठाणे शहरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.


देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सी चा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली. त्या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशाच प्रकारचा प्रयोग ठाणे व मीरा -भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला.


Neutron EV mobility limited या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी घोडबंदर रोड वरील भाईंदर पाडा येथे विहंग हिल्स परिसरातील ४० मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात यावा अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा एक रुपये खर्च होणार नाही. तसेच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन सरनाईक यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा