Pawandeep Rajan : इंडियन आयडॉल विजेत्या 'या' गायकाचा मोठा कार अपघात, गंभीर जखमी

मुंबई: सुप्रसिद्ध रिएलिटी शो इंडियन आयडॉलमुळे देशभरात पोहोचलेला, आणि 12 व्या हंगामचा विजेता पवनदीप राजनचा अहमदाबाद येथे मोठा कार अपघात झाला आहे. ज्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप प्रलंबित जरी असली तरी, सोशल मीडियावरील एका व्हीडिओच्या माध्यमातून पवनदीपला या अपघातात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे.


व्हिडिओमध्ये पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून आले, ज्यामध्ये डॉक्टर त्यांची काळजी घेत असताना देखील पाहायला मिळते आहे.



पवनदीप राजनबद्दल


पवनदीप राजनला संगीताचा वारसा मिळाला आहे. वडील सुरेश राजन आणि काका सतीश राजन यांनी त्याला लहानपणापासूनच गाण्याचं प्रशिक्षण दिलं. त्याचे वडील कुमाऊँचे एक प्रसिद्ध गायक असून, आजोबा रती राजन हे देखील त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध लोक गायक होते. शिवाय पवनदीपची आजी देखील एक लोकगायिका होती. त्याची बहीण ज्योतिदीप देखील एक गायिका आहे. पवनदीपने अगदी लहान वयातच तबला वाजवायला सुरुवात केली. आज तो पियानोपासून ढोलकी, ड्रम, कीबोर्ड आणि गिटारपर्यंत अनेक वाद्ये अगदी सहज वाजवू शकतो.



पवनदीप राजनची प्रकृती कशी आहे?


पवनदीप राजनच्या अपघाताबद्दल अधिक माहिती मिळू शकली नसली, तरी परंतु व्हिडिओमध्ये पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते. या बातमीमुळे त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत असून, त्याच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत आहेत.




Comments
Add Comment

Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् 'धकधक गर्ल'चा मराठमोळा अंदाज; 'कोण होणार करोडपती?'ची तारीख अखेर ठरली!

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील

Katrina Kaif Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खान संतापला; ‘बिग बॉस 20’मध्ये ऑन कॅमेरा शर्ट काढून...

मुंबई : कतरिना कैफ नुकतीच पती विक्की कौशलसोबत गणपती उत्सवात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या वाढलेल्या

Rohed Khan Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'रोहेद खान'चा पत्ता कट; ‘बिग बॉस २०’मध्ये पहिलं एलिमिनेशन

मुंबई : ‘बिग बॉस २०’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि मनोरंजनाची रंगत पाहायला

Ranveer- Deepika 2nd Baby Girl: रणवीर- दीपिकाच्या घरी पुन्हा गौराईचं आगमन, बॉलिवूड कपल दुसऱ्यांदा झाले आई- बाबा

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. दीपिकाने एका

Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिलीच फिल्म ‘भूतम् भयम्’ आता OTTवर दाखल होण्यासाठी

Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया

मुंबई: दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच कलाकृतीने ऑस्कर गाठलं आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'गोंधळ'