मुंबईची 'मटका क्वीन' पुन्हा अडचणीत! गोव्यात सापडली, पतीच्या हत्येनंतरही जुगार साम्राज्य चालवत होती!

पणजी : एका सिनेमात शोभेल अशी तिची कहाणी... पतीची हत्या, आजन्म कारावासाची शिक्षा, पुन्हा जामिनावर बाहेर येऊन जुगाराचा साम्राज्य चालवणं... आणि आता पुन्हा अटक. 'मटका क्वीन' जया छेडाची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


गोवा मटका नेटवर्कचा पर्दाफाश करत गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पणजी, मापुसा, वास्को, मडगाव, पोंडा, मांड्रे अशा अनेक भागांत धडक मारत पोलिसांनी १२ मटका प्रकरणांमध्ये १२ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य नाव पुन्हा समोर आलं आहे ते म्हणजे मुंबईची 'मटका क्वीन' जया छेडा. एकेकाळी पतीच्या हत्येच्या कटात सहभागी असलेली ही महिला आता पुन्हा जुगाराच्या प्रकरणात अडकली आहे.



पोलिसांच्या एफआयआरमध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे, जया छेडा मुंबईमधून 'मटका'चा मुख्य नेटवर्क ऑपरेट करत होती. तिच्या बरोबरच चंदुभाई ठक्कर आणि घनश्याम भाई हे गुजरातमधील डीलर असून अहमदाबादमधून शाखा चालवत होते. म्हणजेच जया छेडा हे या आंतरराज्यीय जुगार रॅकेटचं ब्रेन होतं.



जया छेडा कोण?


जया छेडा हे नावच मटका विश्वात खळबळ उडवणारं आहे. या क्षेत्राची सुरुवात कल्याणजी भगत यांनी केली होती. त्यांचे पुत्र सुरेश भगत यांनी मटक्याचं साम्राज्य फुलवलं, मात्र २००८ साली एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तपासात उघड झालं की हा अपघात नव्हता, तर त्यांची पत्नी जया छेडानेच ही हत्या घडवून आणली होती, केवळ मटका साम्राज्यावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी!


या प्रकरणात जया छेडाला आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती, मात्र २०१८ मध्ये तब्येत खालावल्यामुळे तिला जामिनावर सोडण्यात आलं. पण २०२२ मध्येही तिचं नाव पुन्हा जुगार प्रकरणात आलं होतं.


आता पुन्हा जया छेडा गोव्यात अडकली आहे आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. गोवा पोलिसांचं म्हणणं आहे की, मटका व्यवसाय पूर्णपणे उखडून टाकण्याचा आमचा निर्धार आहे आणि या प्रकरणात सहभागी सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांचा डल्ला! बंद घराची खिडकी तोडून चोरांनी लांबवले सोन्याचे दागिने

मुंबई: दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर गावी जात असतात. याचाच फायदा घेत, मुंबईतील चुनाभट्टीमध्ये

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

[caption id="attachment_1074960" align="aligncenter" width="800"] मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष

Mumbai Local: 26 ऑक्टोबरच्या मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील दुर्घटनेमागील नेमकं कारण काय? रेल्वेचा प्राथमिक निष्कर्ष समोर

मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे 2 लाखांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे अत्यंत तीव्र स्वरूप पाहायला मिळत असून राज्यातील अनेक भागांना

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश