Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर (रविवार) रोजी उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी दिवाळीच्या काळातही काम करीतच होते आणि छठ पूजेच्या वेळीही ते काम करत राहतील, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू राहील. त्यांची निष्ठा आणि कठोर परिश्रमामुळे रेल्वे प्रणाली सुरक्षित व विश्वासार्ह ठरली आहे.

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर (रविवार) रोजी उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी दिवाळीच्या काळातही काम करीतच होते आणि छठ पूजेच्या वेळीही ते काम करत राहतील, जेणेकरून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू राहील. त्यांची निष्ठा आणि कठोर परिश्रमामुळे रेल्वे प्रणाली सुरक्षित व विश्वासार्ह ठरली आहे.

उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' कोणत्या स्थानकांदरम्यान असणार आहे?


ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धिम्या मार्गांवर सकाळी 11:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. तसेच मुलंड येथून सुटणाऱ्या 'डाऊन' धिम्या/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 10:43 ते दुपारी 3:53  या वेळेत मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.



तर कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप' धिम्या/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 10:36 ते दुपारी 3:51 या वेळेत कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर पुन्हा 'अप' धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या सर्व 'अप' आणि 'डाऊन' धिम्या उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत 10 मिनिटे उशिराने चालतील. तर ठाणे उपनगरीय रेल्वे सेवा नियोजित 'डाऊन' धिम्या मार्गावरूनच चालतील.



हार्बर लाईन येथे 'मेगा ब्लॉक' कोणत्या स्थानकांदरम्यान असणार आहे?


पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळता) 'अप' आणि 'डाऊन' हार्बर मार्गांवर सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने जाणाऱ्या 'अप' हार्बर उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 या वेळेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर/पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 या वेळेत रद्द राहतील. तर ट्रान्स-हार्बर लाईन विभागमध्ये पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा, ज्या सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 या वेळेत सुटतात, आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा, ज्या सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 या वेळेत सुटतात, त्या रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, वाशी विभागात विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. तर ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. पोर्ट मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत सुरू राहतील. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे.

Comments
Add Comment

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

[caption id="attachment_1074960" align="aligncenter" width="800"] मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष

Mumbai Local: 26 ऑक्टोबरच्या मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील दुर्घटनेमागील नेमकं कारण काय? रेल्वेचा प्राथमिक निष्कर्ष समोर

मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे 2 लाखांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे अत्यंत तीव्र स्वरूप पाहायला मिळत असून राज्यातील अनेक भागांना

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश

सिडकोचा निर्णय! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ Metro Line 8 ने जोडणार; कोणकोणत्या भागांतून धावणार मेट्रो?

मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईकरांचा विमानतळ प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी सिडकोने (CIDCO) अत्यंत महत्त्वाचे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन