Sai : सईच्या ‘गुलकंद’ सिनेमाने ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी…

मुंबई: प्रेमाला वय नसत.प्रेम हे कुठल्याही वयात होऊ शकतं..अशाच प्रेमाची मजेदार गोष्ट सांगायला सई ताम्हणकर,समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे
असे हसवणारे कलाकार ‘गुलकंद’ चित्रपट घेऊन आले आहेत, नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘गुलकंद’ सिनेमात प्रेक्षकांना दोन कुटुंबीयांची कथा पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून बॅक टू बॅक अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे ‘गुलकंद’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, तगडी कलाकार असल्याने या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.



इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, गुलकंद सिनेमाने पहिल्या दिवशी ५५ लाख रुपये कमावले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमाने २५ लाखांचा गल्ला जमावला. यानंतर शनिवारी पुन्हा एकदा या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ झाली. तिसऱ्या दिवशी ( शनिवार ३ मे ) या ‘गुलकंद’ने ४२ लाखांची कमाई केली. यामुळे ‘गुलकंद’चं कलेक्शन अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाइड १.३७ कोटी इतकं झालं आहे. गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत ‘गुलकंद’ने दणक्यात सुरुवात केली आहे. आता येत्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल्ल आहेत.

 
Comments
Add Comment

Saurav Gurjar : लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप; ‘महाभारत’ फेम सौरव गुर्जरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saurav Gurjar News : ‘महाभारत’ मालिकेत भीमची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन

Salman Khan paparazzi : ‘बिग बॉस २०’च्या मंचावर सलमान खानचा पापाराझींवर संताप; अभिनेत्रींच्या खासगीपणाच्या मुद्द्यावर खडा सवाल

मुंबई : ‘बिग बॉस २०’च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ भागात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पापाराझींच्या

'बिग बॉस ७' फेम सोफिया हयात भाईजानवर भडकली; म्हणाली, "सलमान खान एक नंबरचा ढोंगी आणि..."

मुंबई: 'बिग बॉस २०'चा शनिवारी रात्री 'विकेंड का वार' चा एपिसोड टेलिकास्ट झाला. हा एपिसोड सध्या सोशल मीडियावर

Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् 'धकधक गर्ल'चा मराठमोळा अंदाज; 'कोण होणार करोडपती?'ची तारीख अखेर ठरली!

मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील

Katrina Kaif Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खान संतापला; ‘बिग बॉस 20’मध्ये ऑन कॅमेरा शर्ट काढून...

मुंबई : कतरिना कैफ नुकतीच पती विक्की कौशलसोबत गणपती उत्सवात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या वाढलेल्या

Rohed Khan Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'रोहेद खान'चा पत्ता कट; ‘बिग बॉस २०’मध्ये पहिलं एलिमिनेशन

मुंबई : ‘बिग बॉस २०’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि मनोरंजनाची रंगत पाहायला