रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना

मुंबई : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे.


या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.


सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.


या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांचे पथक असणार असून बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग व सीसीटीव्ही कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.


मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीत, शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे.


या योजनेंतर्गत दरमहा किमान २० टक्के मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरित केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment

Guinness World Records: ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ने रचला इतिहास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’सर्टिफिकेट प्रदान

मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल

Smriti Mandhana: मोठी बातमी! स्मृती मंधाना महिला संघाची कर्णधार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची

NMIA Bus Service: आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळासाठी ST बससेवेची सुरूवात, कशी असेल सुविधा?

मुंबई: नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून नवी मुंबई

Mumbai Local Megablock: कसारा- आसनगाव मार्गिकेवर पुन्हा विशेष ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

ठाणे: मध्य रेल्वेवरील आसनगाव- कसारा मार्गावर तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी विशेष ट्रॉफिक आणि

Missing Link accident : मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका; केळींचा टेम्पो पलटी, बस-ट्रक धडकेत 6 ते 7 जण जखमी

खोपोली : मिसिंग लिंकवर आज पहाटेपासून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री सुमारे 3

Vande Bharat Sleeper : मुंबई-बंगळूरु प्रवास होणार जलद; वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई : मुंबई आणि बंगळूरु दरम्यान जलद रेल्वे सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली