...आता मुंबईकरांना भाड्याचे घर सहज उपलब्ध होणार

म्हाडाचे लवकरच नवीन पोर्टल; मध्यस्थीशिवाय व्यवहाराचा म्हाडाचा प्रयत्न


मुंबई (प्रतिनिधी) : भाड्याने घर शोधणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आता भाड्याने घरे देण्यासाठी एक विशेष डिजिटल पोर्टल लवकरच सुरू करत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कोणताही ब्रोकर, कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट घरमालक आणि घर शोधणारा व्यक्ती यांच्यामध्ये व्यवहार घडवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. राज्यभरात मुंबईसह अनेक शहरांमध्ये लाखो लोक भाड्याच्या घरांमध्ये राहतात. पण घर मिळवणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही.


दलालांकडून फसवणूक, उंचावलेले भाडे, मोठे डिपॉझिट, आणि सुरक्षिततेचा अभाव अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. विशेषतः विद्यार्थी, रुग्ण आणि म्हाडा MHADA मध्यमवर्गीय कुटुंबे यांच्यासाठी हे अधिकच अवघड ठरते. या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'नो ब्रोकर' आणि 'मॅजिकब्रिक्स' सारख्या खाजगी पोर्टल्सच्या धर्तीवर म्हाडाचे हे पोर्टल काम करणार आहे, पण सरकारी खात्रीसह. या पोर्टलवर नागरिकांना त्यांच्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार भाड्याने घर निवडता येणार आहे. फक्त एक नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून ही प्रक्रिया पार पडणार आहे.


यात विशेष म्हणजे, पोर्टलवर भाडेकरारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन, ओळखपत्र पडताळणी अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. म्हणजेच भाडेकरूंना स्वतंत्रपणे कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. हे सगळे काम पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. म्हाडाने या उपक्रमासाठी स्वतंत्र धोरण म्हणजेच रेंटल हाऊसिंग पॉलिसी तयार करण्यास सुरुवात केली असून लवकरच त्याचा मसुदा तयार होणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या सूचना मागवून अंतिम धोरण प्रसिद्ध केलं जाईल.


हे पोर्टल केवळ म्हाडाच्याच नव्हे, तर एसआरए, सिडकोसारख्या अन्य सरकारी संस्थांची घरेही भाड्याने देण्यासाठी खुले असणार आहे. यासह एखाद्या बिल्डर किंवा सामान्य नागरिकालाही आपले घर भाड्याने द्यायचे असेल, तर तोदेखील हे पोर्टल वापरू शकतो. कॅन्सर रुग्ण, विद्याथ्यांसाठी काही महिन्यांसाठी घर हवं असेल, तरीसुद्धा इथे अल्प मुदतीसाठी घर उपलब्ध होणार आहे. एकंदरीत, घर भाड्याने घेणे ही एक डोकेदुखी न राहता, सुलभ आणि विश्वासार्ह प्रक्रिया बनावी हाच म्हाडाचा उद्देश आहे. हा उपक्रम यशस्वी झाला, तर घर शोधणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

KEM Hospital : केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद, स्थायी समिती बैठकीत उमटले तीव्र पडसाद

मुंबई( विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णाला घसरत घसरत उतरावे

BMC : महापालिका स्थायी समितीत सोनियाचा दिवस, विधीमंडळाच्या धर्तीवर महापालिका सभागृहाचे बांधकाम, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांना बसण्यास जागा कमी पडत असल्याने आता

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ऐन दिवाळीमध्ये आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ हाेवून यामध्ये विशेषत:

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा

अंधेरीत एलपीजी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका; आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना