BMC : महापालिका स्थायी समितीत सोनियाचा दिवस, विधीमंडळाच्या धर्तीवर महापालिका सभागृहाचे बांधकाम, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

त्यामुळे या नवीन सभागृहाची रचना विधीमंडळाच्या धर्तीवर असून आता येत्या २०२९मध्ये या नवीन सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकांना विधीमंडळात बसल्याचा भास होणार आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांना बसण्यास जागा कमी पडत असल्याने आता आझाद मैदानातील क्रिडा भवनाच्या जागेवर पर्यायी सभागृहाचे बांधकाम केले जात आहे. या सभागृहाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला अखेर तिसऱ्या प्रयत्नांत मंजुरी प्राप्त झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी हा सोनियाचा दिवस असल्याचे सांगत हा प्रस्ताव मंजूर केला. पुढील २८ महिन्यांमध्ये आवश्यक सर्व मंजुरी प्राप्त करून बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या नवीन सभागृहाची रचना विधीमंडळाच्या धर्तीवर असून आता येत्या २०२९मध्ये या नवीन सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकांना विधीमंडळात बसल्याचा भास होणार आहे.



महापालिका मार्ग, मुंबई येथील फोर्ट विभागातील सी.एस. नं. १४४४ आणि भाग क्र. ४/७२९ या भूखंडावर महानगरपालिका टाऊनहॉल जिमखान्याचा विकास करण्यासाठी यापूर्वी एप्रिल २०२६मध्ये प्रस्ताव सादर झाला होता. परंतु, सध्याच्या महापालिका सभागृहाची जागा अपुरी पडत असल्याने टाऊन हॉलच्या जिमखान्यांच्या वास्तूत सभागृह उभारण्याची मागणी सभागृहनेत्यांनी स्थायी समितीत करून हा प्रस्ताव परत पाठवून सभागृहासह नवीन आराखडा बनवून सुधारीत आरखड्यासह सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुधारीत आराखड्यानुसार महापालिकेने पुन्हा निविदा मागवून हा प्रस्ताव सादर केला आहे. त्यातही प्रशासकीय त्रुटी असल्याने मागील वेळेस हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला असता याबाबतचे सादरीकरण सर्व प्रथम करण्यात आले. त्यानंतर या प्रस्तावावर बोलतांना एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी या जागेचे क्षेत्रफळ ४७०० चौरस मीटर आहे, तर मग आता ५२५१ चौरस मीटर कसे झाले असा सवाल केला, तर भाजपचे तेजिंदरसिंह तिवाना यांनी सभागृहाच्या आतील बाजुस पिलर आहे, तर तो कसा चालेल असा सवाल केला. तर सईदा खान यांनी नगरसेवकांसाठी वाहनतळाची सुविधा पुरेशी नसल्याचे सांगत किमान २५ टक्के तरी वाहनतळाची सुविधा असावी अशी मागणी केली. तर अश्रफ आझमी यांनीही पार्किंगच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपलब्ध याचे बांधकाम कधी पर्यंत पूर्ण होईल अशी विचारणा केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी आज आमच्या सत्ताकाळात नवीन सभागृहाचे बांधकाम केले जात असून यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सभागृहनेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची जाहीर आभार मानले. तसेच प्रस्तावातील युजरच्या गरज व शिफारशीनुसार कामे केली जात आहे या वाक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तर श्रध्दा जाधव यांनी कंत्राटदाराची महापालिकेत अद्यापही नोंदणी केली नसल्याचे सांगितले. शीतल गंभीर यांनी नवीन सभागृह वास्तूत हिरकणी कक्ष आणि महापालिका सचिव विभागाचा कार्यालयासाठी जागा का नाही असा सवाल केला. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी जुनी इमारत आणि नवीन सभागृह यांना जोडणाऱ्या पुलाची उभारणी करण्याची मागणी केली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा सभागृहाच्या बांधकामाचा प्रस्ताव कशाप्रकारे आणला याचे विश्लेषण सांगत हा प्रस्ताव फक्त टाऊनहॉल जिमखान्याच्या बांधकामाचा होता. परंतु सभागृहासाठी हीच जागा योग्य असल्याने सभागृहाच्या बांधकामाचा समावेश करून हा प्रस्ताव आणायला भाग पाडला. याचा प्रत्येक बाबींवर अभ्यास करून आराखडा आणि प्रस्ताव बनवला गेला आहे. त्यामुळे किमान ३०० पेक्षा अधिक नगरसेवक बसतील अशी आसन क्षमता असलेले विधी मंडळाच्या धर्तीवर या सभागृहाचे बांधकाम केले जाणार आहे.


प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी मेट्रो आणि हेरिटेज मान्यतेची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असून हेरिटेज क्षेत्राचे पावित्र्य राखूनच याचे बांधकाम केले जाणार आहे. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावात त्रुटी असतील तर त्यातून मार्ग काढायला हवा आहे. आज हा प्रस्तावाच्या माध्यमातून नवीन पर्वाला सुरुवात होत आहे. आजचा दिवस सोनियाचा दिवस असल्याने सर्वांनी सकारात्मकतेने या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, जेव्हा हे बांधकाम अंतिम होईल तोपर्यंत यावर भरपूर चर्चा करू. यासाठी शासनाची मदत लागली तर त्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे या चांगल्या प्रस्तावाला आपल्या सर्वांच्या संमतीने मंजूर करतो असे सांगत बहुमताने याला मंजुरी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश दरेकर, रमाकांत रहाटे, मिनाक्षी पाटणकर आदींनी भाग घेतला.

Comments
Add Comment

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ऐन दिवाळीमध्ये आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ हाेवून यामध्ये विशेषत:

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा

अंधेरीत एलपीजी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका; आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना

हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रात हाड गोठवणारी थंडी घेऊन येतेय नवीन लाट; 13 नोव्हेंबरपासून हुडहुडी भरणार!

महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने मोठे बदल होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आता थेट राज्यातील

मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांची 'पंचदीप बालगृहात' दिवाळी; कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैजयंती कदमचा विशेष सत्कार!

मुंबई: महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबई शहर पोलीस सहआयुक्त दीपक