PBKS vs RCB, IPL 2025: पंजाबवर एकतर्फी विजय मिळवत आरसीबीची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

मुल्लांपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५चा पहिला फायनलिस्ट संघ भेटला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीच्या संघाने पंजाब किंग्सला सहज हरवत आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.  आरसीबीला विजयासाठी १०२ धावांची गरज होती. आरसीबीने हे आव्हान ८ विकेट राखताना पूर्ण केले आणि जबरदस्त विजय मिळवला आहे.


याआधी आरसीबीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पंजाबचा संपूर्ण संघ १०१ धावांवर परतला आहे. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात पंजाबला केवळ १०१ धावाच करता आल्या. आरसीबीला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १०२ धावा हव्या होत्या. फिल साल्टच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने हे आव्हान ८ विकेट राखत फायनल गाठली आहे.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये चार विकेट गमावले. त्यांचा पहिला विकेट दुसऱ्याच षटकांत पडला. यश दयालने प्रियांश आर्यला बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंहला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जोश हेझलवूडने आपल्या पहिल्याच षटकात श्रेयस अय्यरलाही स्वस्तात तंबूत पाठवले. पॉवरप्लेमध्ये पंजाबला आणखी एक झटका बसला तो जोश इंग्लिशच्या रूपात. तो ४ धावा करून बाद झाला. जोश इंग्लीश बाद झाल्यानंतर पंजाबची धावसंख्या ५.१ षटकांत ४ बाद ३८ होती. त्यानंतरही पंजाबचे एकामागोमाग एक विकेट पडत होते. वेगवान गोलंदाजांचा कहर झाल्यानंतर स्पिनर सुयशने कमाल केली. त्याने आपल्या एकाच षटकांत पंजाबच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. यामुळे पंजाबचा संघ आणखी कमकुवत झाला.


पंजाब किंग्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात विजेता सरळ फायनलमध्ये पोहोचेल.

पंजाब किंग्सचे प्लेईंग ११: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कप्तान), नेहाल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतु्ल्लाह उमरजई, हरप्रीत बराड, अर्शदीप सिंह, काईल जेमिसन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्लेईंग ११ - विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार(कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा(विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा.
Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त