सुधाकर बडगुजरांची उद्धव सेनेतून हकालपट्टी

नाशिक : नाशिक शहर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपाक ठेवून सुधाकर बडगुजर यांच्यावर कावाई करण्यात आली आहे. बडगुजर लवकरच महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये उद्धव सेनेचे अनेकजण पक्षावर नाराज आहेत, असे संकेत दिले होते. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, असे सूतोवाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यामुळे महापालिका निवडणुकीआधी नाशिकमध्ये उद्धव गटाला धक्का बसणार अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.


उद्धव सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकर परिषदेला नाशिकचे उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख असूनही सुधाकर बडगुजर गैरहजर होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याचे बडगुजरांनी कळवले होते. पण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या सुमारास मुंबईतून फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे कळवण्यात आले. यानंतर ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली.


कोण आहेत सुधाकर बडगुजर ?


पक्षातून हकालपट्टी होण्याआधी सुधाकर बडगुजर उपनेते आणि नाशिक शहर जिल्हाप्रमुख होते. ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे जवळचे म्हणून ओळखले जात होते. राजकारणातली कारकिर्द २००७ पासून सुरू करणाऱ्या बडगुजरांनी अल्पावधीत प्रगती केली होती. ते २००९ ते २०१२ या काळात नाशिक महापालिकेचे सभागृह नेते होते. तसेच २०१२ ते २०१५ दरम्यान बडगुजर नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. ते तब्बल १५ वर्ष नाशिक महापालिकेचे नगरसेवक होते.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२