Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५ बीपीएस ऐवजी ५० बीपीएस अंशाने कपात करण्याच्या निर्णयाच्या पार्श्र्वभूमीवर बाजाराने जोरदार उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने ८४५.३८ अंशाने (१.०४ टक्के) वाढत ८२२७०.११ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी २७४.५० अंशाने (१.११%) उसळत २५०२५.४० पातळीवर पोहोचला आहे.


सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सेन्सेक्स १२१.२५ अंशाने तर निफ्टी २८.५० अंशाने घसरला होता. सुरुवातीला गिफ्ट निफ्टीत घसरण झाल्यानंतर बाजाराने आगामी दरात कपात किती होईल यासाठी सावधतेचा पवित्रा घेतला. मात्र आता सर्व स्तरांवर या निर्णयाचे स्वागत झाले. निर्णय जाहीर झाल्यानंतरच रियल्टी समभाग (Shares) २.८० टक्क्यांनी वाढले असून ऑटो निर्देशांकात १.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


शेअर बाजारात निर्णयानंतर श्रीराम फायनान्स (१%), बजाज फायनान्स (४.४९%), जेएसडब्लू स्टील (३.७७%), एचडीएफसी बँक (२.१०%), इटर्नल (२.६३%), एक्सिस बँक (३.७७%) समभागात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक १.५३ टक्क्याने वाढला आहे तर सेन्सेक्स बँक निर्देशांक ०.१७ टक्क्याने घसरला होता. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ झाली.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत