निवडणूक आयोग राजकीय पक्षांना देणार मतदार याद्यांचा डेटा

नवी दिल्ली : निवडणूक आयोग राजकीय पक्षांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या शेअर करणार आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून राहुल गांधींनी यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) संदेश जारी केलाय.


याबाबत राहुल गांधी म्हणाले की, मतदार यादी सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा एक चांगला पहिला टप्पा आहे. हा डेटा डिजिटल आणि मशीन-रीडेबल फॉरमॅटमध्ये (जसे की एक्सेल किंवा सीएसव्ही) कोणत्या तारखेपर्यंत उपलब्ध होईल हे आयोग स्पष्ट करू शकेल का ? त्यांनी या पोस्टसोबत एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार 2009 ते 2024 पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्राची मतदार यादी शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.


विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून अशी मागणी करत आहेत की मतदार यादी केवळ स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपातच नाही तर अशा डेटा स्वरूपात (जसे की एक्सेल, सीएसव्ही इ.) उपलब्ध करून दिली पाहिजे ज्यामुळे तिचे विश्लेषण करणे, अनियमितता ओळखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे शक्य होईल. काँग्रेसने यापूर्वीही निवडणूक आयोगावर निवडणूक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. अलिकडेच राहुल यांनी महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या आरोपांवर एक लेख प्रकाशित केला होता, जो निवडणूक आयोगाने पूर्णपणे नाकारला होता. त्यानंतर, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या 'सूत्रांचा हवाला देऊन खंडन' करण्याच्या वृत्तावरही टीका केली होती.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा