NUCFDC News: NUCFDC तर्फे नागरी सहकारी बँकांसाठी ‘सहकार पाठशाळा’ हा नॅशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू

मुंबई : नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (NUCFDC) नागरी सहकारी बँकांसाठी (UCBs) ‘सहकार पाठशाळा’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रभात चतुर्वेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, NUCFDC, पद्मभूषण बहादुरे, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, NUCFDC, अँडव्होकेट प्रल्हाद कोकरे अध्यक्ष, कॉसमॉस बँक आणि शरद गांगल, अध्यक्ष, टीजेएसबी सहकारी बँक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र पार पडले. या वेळी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकातील विविध नागरी सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि वरिष्ठ प्रतिनिधी असे १०० हून अधिक वरिष्ठ नेतृत्व सहभागी झाले होते.


या उपक्रमाबद्दल NUCFDCचे सीईओ प्रभात चतुर्वेदी म्हणाले, 'भविष्यात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र उभारण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.सहकार क्षेत्र भक्कम करण्यासाठी  ‘सहकार से समृद्धी’ या भारत सरकारच्या व्हिजनशी सुसंगत राहत नागरी सहकारी बँकांचे अनुपालन व्यवस्थापन अधिक बळकट करणे असून, त्यांना अधिक गतिशील, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा संस्थांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम करणे हे  ‘सहकार पाठ शाळा’चे उद्दिष्ट आहे. ही केवळ क्षमताबांधणी नाही तर हा क्षमता परिवर्तन कार्यक्रम आहे. संपूर्ण सहकारी बँक क्षेत्रात गुणवत्ता उंचावणे आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीत नागरी सहकारी बँकांना टिकून राहता यावे यासाठी शाश्वत वाढीचा मार्ग निश्चित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.'


हा अभ्यासक्रम रचनाबद्ध आणि बहुआयामी असून, केवायसी अनुपालन, फसवणुकीच्या धोक्याचे नियंत्रण आणि ट्रेझरी मॅनेजमेंट यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळते. खास नागरी सहकारी बँकांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम ज्ञान वाढविण्यासाठी उपयुक्त आहेच, त्याचप्रमाणे बँकांना त्यांच्या सभासदांच्या गरजा पूर्ण करण्यात आणि नवीन नियमांशी जुळवून घेण्यात मदत करणेही यामुळे साध्य होणार आहे. चांगले प्रशासकीय व्यवस्थापन आणि अनुपालन यावर या उपक्रमामध्ये भर दिला आहे. धोके हाताळण्यासाठी कुशल नेतृत्व तयार करणे, डिजिटल कौशल्य असलेले कर्मचारी घडवणे आणि तंत्रज्ञान व आयटी साधनांचा अधिक चांगला उपयोग करून डिजिटल परिवर्तन वेगाने घडवणे हे यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत.


एनयुसीएफडीसी (NUCFDC) तर्फे 'सहकार पाठशाळा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म'चेही अनावरण करण्यात आले. गेमच्या स्वरूपात तयार केलेले आणि अनेक भाषांमध्ये उपलब्ध असलेले पोर्टल नागरी सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना कुठेही आणि कुठल्याही वेळी सहज शिकता येण्याची सुविधा प्रदान करते. टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या प्लॅटफॉर्मवर इंग्रजीसह प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये सातत्याने शिकता येईल अशी सोय करण्यात आली आहे.


याच वेळी, NUCFDC तर्फे ‘सहकार पाठशाळा इंटरॅक्टिव्ह वेबिनार सिरीज’चीही सुरूवात करण्यात आली असून, ही सत्रे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शुक्रवार रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. या वेबिनारद्वारे नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्यासाठी सतत संवाद साधण्याचे आणि नवीन गोष्टी शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस

[caption id="attachment_1073767" align="aligncenter" width="800"] Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स

Old Phone Reuse: जुना स्मार्टफोन तुमच्या गाडीसाठी डॅशकॅम म्हणून वापरता येतो; कसे ते जाणून घ्या

Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच

नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

नवी मुंबई: गेल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये, दोन सख्ख्या बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची