इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची इराणला साथ

इस्लामाबाद : इस्त्रायल विरोधात सैन्य संघर्षात इराणला चीन, रशियानंतर आता पाकिस्तानची साथ मिळाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेक्शियन यांच्याशी संवाद साधला.इस्त्रायलकडून होणारे हल्ले उकसवण्याचा प्रकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. त्यासोबतच इस्त्रायल विरोधात मुस्लीम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन पाकिस्तानने केले आहे.


शहबाज शरीफ यांनी शनिवारी(दि.१५) इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. हा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देणारा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचेही उल्लंघन केले आहे. इस्त्रायलने विनाकारण केलेल्या हल्ल्याविरोधात पाकिस्तान इराणसोबत एकजुटीने उभा आहे. इराणला आत्मरक्षणाचा अधिकार आहे. इस्त्रायल प्रादेशिक, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे असा आरोपही शहबाज शरीफ यांनी केला.


तसेच शहबाज यांनी जागतिक समुदायाकडे, संयुक्त राष्ट्र आणि मुस्लिम देशांना इस्त्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याबाबत भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे शरीफ यांनी म्हटलं. तर इराणचे राष्ट्रपती यांनीही कठीण काळात आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत इराणची साथ दिल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहेत. शरीफ यांच्या भूमिकेने दोन्ही देशातील संबंध आणखी घनिष्ठ झाल्याचे हे दिसून येते असंही त्यांनी म्हटलं.


इस्त्रायलने शुक्रवारी(दि.१५) इराणच्या अण्वस्त्र सेंटर आणि सैन्य तळांवर हल्ले केले. त्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य प्रमुख आणि अण्वस्त्र वैज्ञानिक मारले गेले. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या तेल अवीव या प्रमुख शहरांवर मिसाईल हल्ले केले.


दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीत इराणने पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. पाश्चात्य देशांनी जर इस्त्रायलला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर पाश्चात्य देशांनी इस्त्रायलवर होणारे इराणी हल्ले रोखण्यास मदत केली तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैन्य ठिकाणांवर आणि त्यांच्या युद्धनौकांवर टार्गेट हल्ला करण्यात येईल असं इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Comments
Add Comment

फारसच्या आखातात दुबईकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशासह चौघे गंभीर जखमी!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळणार? अबू धाबीतील गुप्त त्रिपक्षीय चर्चेने उडाली खळबळ

अबू धाबी: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले असून, गेल्या चार वर्षांपासून जगाला

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन तेलवाहू जहाजांवर भीषण हल्ले; आखातात युद्धाचे ढग दाटले!

तेहरान: मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत खळबळजनक, धक्कादायक आणि युद्धाची

कोरोनाचा नवा व्हेरिएंट PJ.2.1; पुन्हा येणार कोविडची लाट? भारताला किती धोका?

वर्ष 2019-20 मध्ये कोरोना विषाणूने जवळपास संपूर्ण जगाला चिंतातूर करून सोडलं होतं. आता कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार

व्हाईट हाऊसमध्ये राडा! डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या AI व्हिडिओने उडवली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डिजिटल

जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज जेन्सन हुआंग यांच्यावर हेरगिरी होत असल्याच्या वृत्तांनी कॉर्पोरेट