कोरोनाचा नवा व्हेरिएंट PJ.2.1; पुन्हा येणार कोविडची लाट? भारताला किती धोका?

PJ.2.1 हा कोरोना विषाणू (SARS-CoV-2) चा एक नवीन प्रकार आहे. विषाणूच्या जुन्या प्रकारांमधील काही जनुकीय बदलांसह तो उदयास आला आहे.

वर्ष 2019-20 मध्ये कोरोना विषाणूने जवळपास संपूर्ण जगाला चिंतातूर करून सोडलं होतं. आता कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार अस्तित्वात असल्याचे समजते आहे. यावेळी शास्त्रज्ञ PJ.2.1 नावाच्या एका नवीन प्रकारावर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामध्ये विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक बदल आहेत. हे प्रोटीन कोरोना विषाणूला मानवी पेशींना चिकटून आत प्रवेश करण्यास मदत करते. हा प्रकार किती वेगाने पसरू शकतो आणि सध्याच्या प्रतिकारशक्तीचा त्यावर किती परिणाम होईल, हे समजून घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.


PJ.2.1 हा विषाणू सर्वप्रथम मे 2026 मध्ये कॅनडातील ओंटारियो येथे आढळला. त्यानंतर अमेरिका, युरोप, आशिया आणि ओशिनियाच्या काही भागांमध्ये याच्या अस्तित्वाचे अहवाल अमोर आले आहेत. जसजसा त्याचा प्रसार होत आहे, तसतसे कोविड 19 ची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या लसी या नवीन प्रकाराविरुद्ध प्रभावी ठरतील का? हा विषाणू कोविड 19 च्या जुन्या प्रकारांपेक्षा अधिक धोकायदायक आहे का? जाणून घेऊया...


PJ.2.1 हा कोरोना विषाणू (SARS-CoV-2) चा एक नवीन प्रकार आहे. विषाणूच्या जुन्या प्रकारांमधील काही जनुकीय बदलांसह तो उदयास आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ते MC.10.1.7 या वंशावळीचा आहे जी पूर्वी JN. 1 शी संबंधित होती. या व्हेरिएंटवरील एक अभ्यास ऑक्टोबर 2026 मध्ये 'जर्नल ऑफ इन्फेक्शन' मध्ये प्रकाशित झाला. जर्मन शास्त्रज्ञ मार्कस हॉफमन आणि त्यांच्या टीमने PJ.2.1संचारानं पद्धती आणि त्याच्या स्पाइक प्रोटीनच्या वर्तनाचा अभ्यास केला. यातून असे दिसून आले की, PJ.2.1 मध्ये काही विशिष्ट बदल आहेत जे त्याला मानवी पेशींशी जोडले जाण्यास मदत करू शकतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये PJ.2.1 चे स्पाइक प्रोटीन असलेल्या कणांनी इतर प्रकारांच्या तुलनेत काही पेशींमध्ये सुमारे 1.5 ते 2.5 पट जास्त प्रवेश करण्याची क्षमता दर्शविली.



कोरोना लस नवीन व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल का?


PJ.2.1 बाबतचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लसीमुळे मिळणारे संरक्षण. स्पाइक प्रोटीनमधील बदलांमुळे, शरीरातील विद्यमान अँटीबॉडीज या व्हेरिएंटला ओळखण्यास कमी सक्षम असतील अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, प्राथमिक संशोधनाचे निष्कर्ष काहीसे दिलासादायक आहेत. 'जर्नल ऑफ इन्फेक्शन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, PJ.2.1 हा इतर अनेक व्हेरिएंट्सच्या तुलनेत लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना चकमा देण्यास कमी सक्षम असल्याचे आढळून आले आहे. विषाणूचा वेगाने होणारा प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जरी PJ.2.1 ने पेशींना चिकटून राहण्याच्या क्षमतेत वाढ झाल्याची सुरुवातीची चिन्हे दाखवली असली तरी, हा प्रकार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजार निर्माण करतो याचा कोणताही पुरावा नाही.


भारतात स्थिती काय?


PJ.2.1 चे रुग्ण अमेरिका, कॅनडा, युरोप, आशिया आणि ओशोनियाच्या काही भागांमध्ये आढळले आहेत. भारतात त्याच्या अस्तित्वाची अद्याप पुष्टी झालेली नाही. INSACOG (इंडियन सार्स कोव्ह 2 जिनोमिक्स कन्सोट्रीयम) नेटवर्क भारतातील कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारांना ओळखण्याचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करते. या नेटवर्कअंतर्गत विविध राज्यांमधून कोविड 19 चे नमुने गोळा केले जातात आणि त्यांच्या जनुकीय रचनेचे अनुक्रमण केले जाते.

Comments
Add Comment

व्हाईट हाऊसमध्ये राडा! डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या AI व्हिडिओने उडवली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डिजिटल

जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज जेन्सन हुआंग यांच्यावर हेरगिरी होत असल्याच्या वृत्तांनी कॉर्पोरेट

Jensen Huang : एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग चौकशीच्या फेऱ्यात; अ‍ॅलिस हुआंग यांच्यावरील हेरगिरीच्या संशयामुळे खळबळ

Jensen Huang: जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्याभोवतीचा वाद

Egypt Railway Accident 2026: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन ट्रेनची टक्कर, 7 जणांचा जागीच मृत्यू

Egypt Railway Accident 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

जपान हादरले! मध्य जपानमध्ये 5.7 तीव्रतेचा महाभूकषक; डझनभर नागरिक जखमी

जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पहाटे