IND vs ENG: ऋषभ पंतने शतक ठोकून रचला 'महाविक्रम', धोनी-साहाला टाकले मागे

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant)ने आणखी एक शानदार शतक ठोकून इतिहास रचला आहे. पंत आता भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा नियुक्त यष्टीरक्षक बनला आहे. विशेष म्हणजे हे त्याच्या कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक आहे, याद्वारे त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (६ शतके) आणि वृद्धिमान साहा (३ शतके) यांना मागे टाकले आहे.

लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत पंतने कर्णधार शुभमन गिलसोबत मोठी भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. पंतची खेळी केवळ तांत्रिकदृष्ट्या मजबूत नव्हती, तर इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध त्याच्या आत्मविश्वासाने आणि आक्रमक शैलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे.

पंतची जबरदस्त कामगिरी


पंतने त्याच्या वादळी खेळीद्वारे आणखी अनेक विक्रम रचले आहेत. शतक पूर्ण करताना पंतने १० चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडमधील पंतचे हे तिसरे कसोटी शतक होते. पंतने परदेशातील भूमीवर एकूण ५ कसोटी शतके आणि मायदेशात २ कसोटी शतके ठोकली आहेत. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ३ शतके करणारा पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे.



इंग्लंडचा कसोटी संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

भारतीय कसोटी संघ: केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी: जून २०-२४, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरी कसोटी: 2-6 जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरी कसोटी: 10-14 जुलै, लॉर्ड्स (लंडन)

चौथी कसोटी: 23-27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल (लंडन)

 
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून