Donald Trump यांना हवाय शांततेचा नोबेल! काँगो-रवांडा शांतता करारानंतर व्यक्त केली आशा

काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली नोबेल पुरस्काराची आशा


वॉशिंग्टन:  अमेरिकेच्या मध्यस्थीने, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि रवांडा यांनी हिंसाचार संपवण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रारंभिक शांतता करारावर स्वाक्षरी केली. यावर प्रतिक्रिया देताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यंग्यात्मकपणे म्हंटले की इतके प्रयत्न करूनही त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोवो, अब्राहम करारासह अनेक उदाहरणे दिली ज्यामधील संघर्ष त्यांनी संपुष्टात आणला असे ते म्हणतात. 


काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (DRC) आणि रवांडा यांनी पूर्व काँगोमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार संपवण्यासाठी प्रारंभिक करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांमधील हा करार बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला, ज्यामध्ये अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली. याचा दाखला देत, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्काराची आशा व्यक्त केली आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते कोणत्याही श्रेणीत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा मागे राहू इच्छित नाहीत. उदाहरणार्थ, ते ओबामांसारखे दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, परंतु त्यांच्या नावावर नोबेल शांतता पुरस्कार नाही. त्यांना बऱ्याच काळापासून याची अपेक्षा होती. ट्रम्प अनेकदा याबद्दल टोमणे मारतात आणि आता रवांडा-काँगोमध्ये झालेल्या संभाव्य शांतता करारानंतर त्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीवर बोलायला सुरुवात केली आहे.  



"मी कितीही केलं तरी... नोबेल मिळणार नाही"- ट्रम्प


ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा दावा पुन्हा एकदा केला. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मला यासाठी (काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि रवांडा प्रजासत्ताक यांच्यातील करारासाठी) नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही." त्यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याबद्दल मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, सर्बिया आणि कोसोवोमधील युद्ध थांबवल्याबद्दल मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही." ट्रम्प पुढे म्हणाले, "इजिप्त आणि इथिओपियामध्ये शांतता राखल्याबद्दल मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही आणि मध्य पूर्वेत अब्राहम करार करण्यासाठीदेखील मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, जर सर्व काही ठीक राहिले तर आणखी देशांना मी  एकत्र आणेल आणि "युगात" पहिल्यांदाच मध्य पूर्वेला एकात्मिक करेल! पण  मी काहीही केले तरी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, रशिया-युक्रेन आणि इस्रायल-इराणसह, परिणाम काहीही असोत, लोकांना माहिती आहे मी काय केलं आहे आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे!"



रवांडा-काँगोदरम्यान शांतता करारावर स्वाक्षरी


अमेरिकेत रवांडा-काँगो यांच्यात तीन दिवसांच्या राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक चर्चेनंतर, दोन्ही देशांनी एका मसुदा करारावर स्वाक्षरी केली आहे, जो येत्या काही दिवसांत अंतिम केला जाऊ शकतो. मसुदा करारात अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत, जसे की, शस्त्रे वापरणे थांबवतील, राज्याबाहेरील सशस्त्र गटांना नष्ट करतील आणि निर्वासित आणि अंतर्गत स्थलांतरितांना परत घरी आणतील.


पूर्व काँगो बराच काळ सशस्त्र संघर्षाशी झुंजत आहे. नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे अनेक सशस्त्र गट लढत होते. या वर्षी जानेवारीमध्ये रवांडाचा पाठिंबा असलेल्या M23 बंडखोर गटाने गोमा शहर ताब्यात घेतल्यावर दोघांमधील हिंसाचार आणखी भडकला. हा भाग नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. काही आठवड्यांनंतर त्यांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बुकारू शहराचाही ताबा घेतला. तथापि, रवांडाने या बंडखोरांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत. अनेक पक्षांवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराचे वर्णन त्यांची आणखी एक शांतता कामगिरी म्हणून केले आणि सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहिली की त्यांनी कितीही शांतता प्रस्थापित केल्याली तरी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार काही मिळणार नाही.



ओबामांना वर्षभरात मिळालेला शांतता पुरस्कार


बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली त्याला एक वर्षही झाले नव्हते तोच त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. याउलट आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी जीवापाड मेहनत करुनही दखल घेतली जात नाही. शांततेचा नोबेल जाहीर केला जात नाही म्हणून अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहे. ही नाराजी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. एकाच पोस्टमध्ये तब्बल सहा वेळा ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराचा उल्लेख केला आहे. हे कमी म्हणून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रियेवेळीही ट्रम्प यांनी वारंवार नोबेल पुरस्काराचा उल्लेख केला.

अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी २० जानेवारी २००९ रोजी पहिल्यांदा शपथ घेतली होती. त्यांना ९ ऑक्टोबर २००९ रोजी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. ओबामा यांनी १० डिसेंबर २००९ रोजी ओस्लो येथे नोबेल पुरस्कार स्वीकारला होता. शपथ घेतल्यापासून वर्षाच्या आत नोबेल पुरस्कार मिळवणारे ते जगातले पहिलेच नेते होते. पण ओबामा होते डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते. तर डोनाल्ड ट्रम्प आहेत रिपब्लिकन पक्षाचे नेते. यामुळेच एका डेमोक्रॅटला वर्षभरात नोबेल मिळू शकते तर मला का नाही अशा अजब इर्षेने पेटलेले ट्रम्प सध्या जागतिक शांततेचे श्रेय लाटण्याची धडपड करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Comments
Add Comment

US Iran Conflict : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी; अमेरिकेचा इराणवर हल्ला, प्रत्युत्तरात एरबिलमधील US तळावर क्षेपणास्त्रांचा मारा

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकन सैन्याने मंगळवारी इराणमधील इराणी

Nepal Himalayan Flood : नेपाळ-तिबेटमध्ये हिमालयीन महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा १,०६६ वर, अजूनही ४,४६२ जण बेपत्ता

नेपाळ : २६ ऑगस्ट रोजी हिमालयीन भागात आलेल्या भीषण पुरानंतर नेपाळ आणि तिबेटमध्ये परिस्थिती अद्याप गंभीर आहे.

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी