नीरज चोप्राने ५ दिवसांत सलग दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव

पॅराग्वे :नीरज चोप्राने ५ दिवसांत सलग दुसऱ्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने चेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक मीट स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं. आणि सलग २४ व्यांदा पहिल्या दोन भालाफेकपटूंमध्ये स्थान मिळवले आहे.


पॅरिस डायमंड लीग जिंकल्यानंतर नीरजने ओस्ट्रावामधील या स्पर्धेत ८५.२९ मीटरचा सर्वोत्तम भाला फेकला. आणि त्याने गोल्डन स्पाइक मीटमध्ये अगदी सहज सुवर्णपदक जिंकला.


दक्षिण आफ्रिकेच्या डाऊ स्मितने ८४.१२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक केली आणि अँडरसन पीटर्सच्या पुढे दुसरे स्थान पटकावले. पीटर्सने ८३.६३ मीटरची सर्वोत्तम फेक केली. दरम्यान, नीरजला तुलनेने कमी अंतरावर फेकलेल्या भालाफेकीबाबत


फारशी काळजी वाटणार नाही. कारण ५ जुलै रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेपूर्वी त्याचा विजयी फॉर्म कायम आहे. ही स्पर्धा त्याच्यासाठी निश्चितच खूप भावनिक असणार आहे.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम