कशी आहे शुभांशू शुक्लाची अ‍ॅक्सिओम-४ मोहीम ?

नवी दिल्ली : तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहे. अ‍ॅक्सिओम-४ मोहीमेंतर्गत शुभांशू शुक्ला २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे. शुभांशू शुक्ला आणि त्याचे तीन सहकारी असे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १४ दिवस राहतील, नेमून दिलेली कामं करतील आणि परत येतील. नियोजनानुसार बुधवार २५ जून रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटाने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे २८ तासांच्या प्रवासाला रवाना होणार आहेत.

अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

ताज्या वृत्तानुसार अंतराळवीर यानात बसले आहेत. यानाच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. यान २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. तिथे पोहोचताच यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले जाईल. ही डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यानातील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करतील.



अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर १४ दिवसांत ६० प्रयोग करणार आहे. प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संशोधन केले जाणार आहे. पृथ्वीपासून कमी अंतरावरील कक्षेतले गुरुत्वाकर्षण या विषयाशी संबंधित संशोधन प्रामुख्याने केले जाणार आहे.

  1. शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील. तसेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील.

  2. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) प्रकल्पातील अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे १९७८ नंतर अंतराळात जाणारे दुसरे पोलिश अंतराळवीर असतील.

  3. टिबोर कापू हे १९८० नंतर अंतराळात जाणारे दुसरे हंगेरियन अंतराळवीर असतील.

  4. पेगी व्हिटसन तिच्या दुसऱ्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वाधिक काळ हा तिचा सध्याचा विक्रम आहे.


 
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा