ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे महापालिकेमध्ये कोणताही अधिकृत नगरसेवक नसतानाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणुका न झालेल्या काळात देखील अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी ‘आमच्याच प्रयत्नातून काम’ झाल्याचा दावा करत ठिकठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शहरात बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.


माजी नगरसेवकांनी लावलेल्या या बॅनर्सवर सार्वजनिक कामांचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. ‘पाणी योजना पूर्ण – आमच्या प्रयत्नातून’, ‘रस्ता काँक्रीटीकरण – आमच्या पाठपुराव्याचा परिणाम’, अशा आशयाचे बॅनर्स नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्समध्ये महापालिका प्रशासनाचा उल्लेखही नसतो, जणू सर्व निर्णय हे त्यांच्या 'सांगण्यावरूनच' झाले आहेत, असा त्याचा आभास निर्माण केला जातो.


मात्र या बॅनरबाजीमुळे संबंधित पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जात आहेत. ‘नगरसेवक नसतानाही केवळ पुढील निवडणुकीत उमेदवारी हवी म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या प्रकारे एकहाती श्रेय लाटले जात आहे", अशी नाराजी काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, कोपरीपासून ते वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात अशा प्रकारच्या बॅनर्सचा सुकाळ झाला आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय इच्छुक मंडळी ‘सक्रिय असल्याचे’ दाखवण्यासाठी नागरी कामांचे श्रेय घेताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासक आणि अधिकारी यांच्या माध्यमातूनच सर्व योजना राबवल्या जात आहेत.


महापालिकेतील सत्ताविरहित कालावधीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या

Thane incident : ठाण्यात दुचाकी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने वकिलाचा मृत्यू; मन हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thane : ठाणे शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Eknath Shinde : ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ' लाडक्या बहिणींचा' जनसागर, आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा

ठाणे : आनंद दिघेंच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या