सानपाड्यातील समस्या सोडविण्यासाठी भाजपाची पालिकेवर धडक

लवकरात लवकर समस्यांचे निवारण करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन


नवी मुंबई : सानपाडा नोडमधील नागरी समस्या निवारणासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाड्यातील रहिवाशांसमवेत महापालिका मुख्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांकडून पांडूरंग आमले व त्यांच्यासमवेत गेलेल्या शिष्टमंडळातील रहिवाशांना देण्यात आले.


सानपाडा सेक्टर १० मधील झाशीची राणी मैदान व सेक्टर ७ मधील सीताराम मास्तर उद्यानाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, सानपाडा सेक्टर ७ मधील सप्तरंग सोसायटी व बाबू गेनू मैदानासमोरील रस्त्यावरील चेम्बर्सची दुरुस्ती करण्यात यावी, पावसाळा सुरु झाला तरीही सानपाडा नोडमधील धोकादायक झाडांची व ठिसूळ झालेल्या फांद्याची छाटणी झालेली नसल्याने जिवितहानी व मालमत्तेची संभाव्य हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने वृक्षछाटणी अभियान राबवावे, सानपाडा सेक्टर ८ मधील पदपथावर अतिक्रमण करुन पदपथ गिळकृंत करणाऱ्या फेरीवाल्यांना तातडीने हटवून स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हे पदपथ उपलब्ध करुन देण्यात यावे, सेव्हन्थ डे या शाळेसमोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होत असलेली गर्दी व वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यात यावा, सानपाडा नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांबूस, पिवळसर व लालसर रंगाचे दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला असल्याने या समस्येचे निवारण करुन रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा मागण्या पांडूरंग आमले व शिष्टमंडळातील स्थानिक रहिवाशांनी त्या त्या विभागाच्या उपायुक्तांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन सादर करत समस्या निवारणाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.


पालिका उपायुक्तांनी आमले व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

उन्हाळ्यापूर्वीच पनवेलकरांवर पाणीसंकट! आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, कोणत्या भागात केव्हा पाणी नसेल?

पनवेल: यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी आहे.

Navi Mumbai water cut news : नवी मुंबईकरांनो सावधान! उद्या १२ तास पाणी बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना उद्या, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी पाणीटंचाईला सामोरे

Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील एका तेल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. मॅफ्को

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा

NMMC mosquito control drive : नवी मुंबईत डास नियंत्रणासाठी विशेष मोहीम; 21 नोव्हेंबरपर्यंत विविध भागांत रासायनिक फवारणी

मुंबई : नवी मुंबई शहरात डासांची पैदास रोखण्यासाठी आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी

Navi Mumbai Crime: आयफोनच्या EMI वरून मित्रांमध्ये वाद, पनवेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह झुडपात फेकला, आरोपीला अटक

मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे.