Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मध्ये रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सप्तश्रृंगी ऑईल कंपनीसह शेजारच्या प्लायवुड आणि कुरियर कंपनीचे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट पाहायला मिळाले, मात्र सुदैवाने रविवार असल्याने मोठी जीवितहानी टळली.

नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील एका तेल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. मॅफ्को मार्केटच्या मागच्या बाजूला असणाऱ्या सप्तश्रृंगी ऑईल कंपनीच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. ऑईल कंपनीला लागलेल्या आगीमुळे, शेजारी असणाऱ्या एका प्लायवुड कंपनीला आणि कुरियर कंपनीला सुद्धा आग लागल्याची घटना घडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही आग लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बराच वेळ भीतीचे वातावरण होते. सप्तश्रृंगी ऑईल कंपनीमध्ये लागलेल्या आगीने शेजारी असणाऱ्या इतरत्र दोन कंपन्यांनाही आपल्या कवेत घेतले होते. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आगीच्या ज्वाळांचा भडका परिसरामध्ये पाहायला मिळत होता.






दरम्यान, ऑईल कंपनीला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुरांचे लोट दूरवरुन पाहायला मिळत होते. ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये घबराट होती. या भीषण आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर मात्र वित्तहानी झालेली आहे. सुदैवाने, घटना घडली त्यादिवशी रविवारचा दिवस होता, त्यामुळे कंपनीमध्ये कामगार नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची दिलासादायक बाब आहे. आगीची घटना नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील प्लॉट क्रमांक 38 मध्ये, मॅफ्को मार्केटच्या मागे सप्तश्रृंगी ऑईल कंपनी आहे. आग लागलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आणि वेगवेगळे गोदाम आहेत. त्यामुळे तिथे आग भडकण्याची मोठी शक्यता होती.


 


इंडस्ट्रीयल कंपन्यांनी वेढलेल्या ह्या परिसरामध्ये आगीचा भडका झाला असता तर, शेजारील कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर धोका उद्भवला असता. तेल कंपनीला आग लागल्यामुळे आग भडकण्याची मोठी शक्यता होती. पण शेजारी असणाऱ्या एका प्लायवुड कंपनीला आणि कुरियर कंपनीला सुद्धा आग लागली होती. आगीदरम्यान होणाऱ्या स्फोटसदृश आवाजांमुळे स्थानिक नागरिक आणि आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठी घबराट उडाली आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याची कोणतीही माहिती अद्यापही मिळालेली नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे घटनेचा तपास केला जाणार आहे. आगीत तीन कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या मालाची मोठी हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.






आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ धाव घेत संपूर्ण घटना ताब्यात घेतली. ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन केंद्रांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान गोदामाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत संपूर्ण आग नियंत्रणात आली. मात्र, तेलाचा मोठा साठा आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली, हे मात्र नक्की. प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार आगीची घटना रात्री 9 घडली होती. मात्र आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करावे लागले. खबरदारीच्या उपायाकरिता स्थानिक पोलीस आणि इतर बचाव यंत्रणांना घटनास्थळी तैनात करत संपूर्ण घटना नियंत्रणात आणली गेली.

Comments
Add Comment

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

CHM College: उल्हासनगरचा विकास आराखडा तयार होणार! सिंधी बांधवांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया लवकरच

ठाणे: उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम)