NMMC mosquito control drive : नवी मुंबईत डास नियंत्रणासाठी विशेष मोहीम; 21 नोव्हेंबरपर्यंत विविध भागांत रासायनिक फवारणी

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एका दिवसात फवारणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई : नवी मुंबई शहरात डासांची पैदास रोखण्यासाठी आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेने विशेष फवारणी मोहीम सुरू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये रासायनिक फवारणी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एका दिवसात फवारणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.






महापालिकेने ही मोहीम सहा गटांमध्ये विभागली असून, त्यानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये फवारणी केली जात आहे. 16 नोव्हेंबर रोजी सीबीडी, वाशीगाव, इंदिरानगर आणि रबाडा परिसरात फवारणी करण्यात आली. 17 नोव्हेंबर रोजी सेक्टर 48, कुकशेत, सानपाडा, खैराणे आणि दिघा भागात मोहीम राबवण्यात येणार आहे.


18 नोव्हेंबर रोजी करावे, नेरुळ-2, तुर्भे, महापे आणि ऐरोली परिसरात फवारणी केली जाईल. 19 नोव्हेंबर रोजी शिरवणे, जुहूगाव, काटकरीपाडा आणि चिंचपाडा येथे फवारणीचे नियोजन आहे. 20 नोव्हेंबर रोजी नेरुळ-1, पावणे, घणसोली आणि इल्थानपाडा परिसरात फवारणी केली जाणार असून, 21 नोव्हेंबर रोजी नोसिल नाका परिसरात ही मोहीम राबवली जाईल.





डास नियंत्रणासाठी पालिकेचे विशेष नियोजन


महापालिकेकडून नियमितपणे अळीनाशक फवारणी आणि धूर फवारणी केली जात असते. मात्र, डासांची वाढ रोखण्यासाठी या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी फवारणीसाठी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


महापौर सुजाता सूरज पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. फवारणीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदारांसोबत बैठक

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा

Aadhaar Card : आधार कार्डचा वापर कुठे झाला? घरबसल्या तपासा 6 महिन्यांची हिस्ट्री; अनोळखी व्यवहार दिसल्यास 'हे' काम करा!

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने

IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता

टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडची घातक चाल; खेळपट्टीवर उतरवणार 3 वेगवान अस्त्रे!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून