XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर 


मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आता संपली असून,  राज्यातील अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ही यादी दिनांक ३० जूनला जाहीर होणार होती, पण शिक्षण संचालनालयाकडून ती आजच जाहीर करण्यात आली आहे.


जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांना https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.



३० जून ते ७ जुलै दरम्यान कॉलेज प्रवेश निश्चित करायचा आहे


सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार ३० जून ते ७ जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत 12 लाख 71 हजार विद्यार्थी आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन आपली गुणवत्ता यादी पाहून प्रवेशाचा निर्णय घ्यावा.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी