Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी


मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका इंग्रजी भाषेत मिळावी, यासाठी ९ आमदारांनी विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. आज (गुरुवार, दि. ३ जुलै) विधानसभेत इंग्रजी भाषेत असलेली कामकाजपत्रिका पाहून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कामकाजपत्रिका इंग्रजीतून का?’, असा प्रश्न औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केला. इंग्रजीशिवाय इतकीच अडचण येत असेल, तर त्या आमदारांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा, असे उपरोधिक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी केले.



इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी?


सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘विधानसभ नियमातील प्रावधानानुसार सभागृहातील कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालवता येत असले, तरी अद्यापपर्यंत सभागृहात इंग्रजीतील कामकाजपत्रिका मी पाहिलेली नाही. एकिकडे मराठीला अभिजात भाषा करायची आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशासाठी? मराठी समजायला अडचण असेल, तर कामकाजपत्रिका हिंदीतून काढावी. हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन, हे धोरण चुकीचे आहे.



इंग्रजीशिवाय अडचण असेल तर ब्रिटनच्या संसदेत पाठवावे


महाराष्ट्राच्या विधानसभेचे नियमावली करतांना त्या वेळी इंग्रजीचा प्रभाव असेल; परंतु याविषयी नियम समितीची बैठक घेऊन कामकाजातील इंग्रजी शब्द काढून टाकावेत. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. एखाद्याला मराठी शिकायला खूपच अडचण असेल, त्यांनी हिंदी शिकावी; परंतु इंग्रजीशिवाय खूपच अडचण असेल, तर त्यांना ब्रिटनच्या संसदेत पाठवावे. एकीकडे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना राज्यात मराठी शिकायला लावले जाते; परंतु ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याकरता हिंदीची संधी असतांना इंग्रजीतून कामकाजपत्रिका कशाकरिता?’’, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या औचित्याच्या सूत्रावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कामकाजपत्रिका काढतो, अशी माहिती सांगून इंग्रजीतून कामकाजपत्रिकेसाठी आमदारांनी विनंती केल्याचे म्हटलं

Comments
Add Comment

Mumbai Airport : मुंबईतील एकही विमानउड्डाण नवी मुंबईत स्थलांतरित होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारला पत्र

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ; ५४ नव्या पदार्थांचा समावेश

मुंबई : मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात सुधारणा करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना

Kedarnath Temple : केदारनाथ यात्रा समाप्त, यंदा 19.22 लाख भाविकांनी घेतले दर्शन; 'जय बाबा केदार'च्या जयघोषात दरवाजे बंद

Kedarnath Temple : उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामची यंदाची यात्रा संपन्न झाली आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाबा

Mumbai Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! स्वयंचलित दरवाजे असलेली पहिली नॉन-एसी लोकल दाखल; प्रवाशांना कधीपासून करता येणार प्रवास?

Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रचंड

Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Mumbai News: मुंबईतील वडाळा येथील प्रतीक्षा नगर पोलीस क्वार्टर्सजवळ मंगळवारी रात्री आगीची घटना घडली. माला गार्डन

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे