आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’चा अंतिम सोहळा...

सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांनसमोर सातत्याने आणले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं. सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो ने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मनं जिंकली. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.आपल्या भारावून टाकणाऱ्या कीर्तनाने या सगळ्या कीर्तनकारांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं.यात सहभागी सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तन सादरीकरणाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तमोत्तम कीर्तनकारांमधून सहा सर्वोत्तम कीर्तनकार स्पर्धकांनी आता अंतिम फेरी गाठली आहे.

हरिनामाचा गजर करीत दर्शनासाठी आतुरलेला वारकरी आणि लाखोंच्या संख्येने होणारा टाळमृदंगाचा नाद अशा भक्तिमय वातावरणात गेली कित्येक वर्षे पंढरपूरची वारी अविरतपणे सुरू आहे. कीर्तनातून संतवाणी ऐकण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने वारक-यांना मिळत आहे. यंदा हीच संधी प्रेक्षकांना घरबसल्या सोनी मराठी वाहिनीमुळे मिळणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा अंतिम सोहळा येत्या ६ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार आहे.

सहा स्पर्धकांमध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. अप्रतिम कीर्तन सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या पहिले कीर्तन रत्न - ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, दुसरे कीर्तन रत्न - ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे , तिसरे कीर्तन रत्न - ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, चौथे कीर्तन रत्न- ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, पाचवे कीर्तन रत्न- ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, सहावे कीर्तन रत्न- ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे या सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार ६ जुलैला हा अंतिम सोहळा सकाळी ८.०० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने उत्तम प्रतिभा आणि गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. सोनी मराठी वाहिनीने कायमच अभिनव अशा प्रकारच्या संकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो ही त्याचाच एक भाग होता. सोनी मराठी वाहिनीच्या या अभिनव संकल्पनेला कीर्तनकार स्पर्धकांनी, परीक्षकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी तितकीच उत्तम साथ दिली.
Comments
Add Comment

Ramayana Oscar 2027: रणबीर कपूरच्या रामायणची ऑस्करच्या शर्यतीत एंट्री?

मुंबई: बॉलीवूडचे ख्यातनाम आणि अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित व महाकाय

कर्णधार गिल लग्नबंधनात अडकणार? रोहित शर्मा शोमध्ये शुभमन बद्दल काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित' हा शो सध्या बऱ्याच लोकप्रिय होत आहे. या शोच्या

Matrubhumi Trailer 2026: सलमान खानच्या मातृभमी ट्रेलरवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया; मेजर सोइबा मॅनिंगबा यांना अधिक स्क्रीन टाइम मिळायला हवा होता...

Matrubhumi Trailer 2026: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस हा चित्रपटाचा ट्रेलर अखेर 10

Matrubhumi Trailer : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 4 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Matrubhumi Trailer: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर

Ranabaali OTT Release: अवघ्या चार आठवड्यांत 'रणबाली'चा OTT प्रवास सुरू; कधी आणि कुठे पाहाल?

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'रणबाली' या

Amruta Khanvilkar Secrets: अमृता खानविलकरचा मजेशीर खुलासा! आयुष्यातील तीन 'गुन्हे' सांगत अभिनेत्रीने जिंकली मनं

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही आपल्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि दिलखुलास