Matrubhumi Trailer 2026: सलमान खानच्या मातृभमी ट्रेलरवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया; मेजर सोइबा मॅनिंगबा यांना अधिक स्क्रीन टाइम मिळायला हवा होता...

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस हा चित्रपटाचा ट्रेलर अखेर 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात करण्यात आला. गलवान खोऱ्यातील घटनांवरून प्रेरित असा हा चित्रपट आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित आणि सलमान खान व चित्रांगदा सिंग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

Matrubhumi Trailer 2026: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस हा चित्रपटाचा ट्रेलर अखेर 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात करण्यात आला. गलवान खोऱ्यातील घटनांवरून प्रेरित असा हा चित्रपट आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित आणि सलमान खान व चित्रांगदा सिंग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.


सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) नुकतीच या चित्रपटाच्या ट्रेलरला मंजुरी दिली, ज्यानंतर तो अखेर १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या युद्धपटाची पहिली झलक खूपच प्रभावी असून सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट देशभक्ती, त्याग आणि युद्धाची मानवी किंमत दर्शवणारी एक शक्तिशाली कथा सादर करतो. युद्धाचा कुटुंबांवर होणारा भावनिक परिणामही या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे.


'मातृभूमी'चा ट्रेलर प्रदर्शित
ट्रेलरमध्ये सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. देशभक्तीने परिपूर्ण असा 'मातृभूमी' हा चित्रपट असणार आहे आणि ट्रेलरमध्ये अनेक नेत्रदीपक क्षण आहेत, ज्यात जबरदस्त ॲक्शन, लढाई आणि नेत्रदीपक दृश्यांचा समावेश आहे. हा चित्रपट एक शक्तिशाली संदेशही देतो युद्धाचा शेवट कोणासाठीही कधीच सुखाचा होत नाही. दोन्ही बाजूंनी जीव गमावले जातात, कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि युद्धाचा परिणाम रणांगणाच्या पलीकडेही पोहोचतो, हे आपल्याला ह्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.



चित्रपट प्रदर्शनाची तारीख
'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 4 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शिवाय चित्रपटचा कालावधी 4 मिनिटे आणि 43 सेकंद असल्याचे सांगण्यात येत आहे.


हा चित्रपट 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय सैनिकांच्या आणि चिनी सैनिकांच्या संघर्षावर आधारित आहे. हातघाईच्या लढाईत झालेल्या या घटनेत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. अनेक दशकांतील दोन्ही देशांमधील सर्वात गंभीर लष्करी संघर्षांपैकी एक म्हणून याची नोंद झाली. या चित्रपटाचे मूळ नाव 'बॅटल ऑफ गलवान' होते. तसेच हा चित्रपट मूळतः एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यासह इतर अनेक तारखांचा निर्मात्यांनी विचार केला, पण तरीही चित्रपट चित्रपटगृहांपर्यंत पोहोचू शकला नाही.


या चित्रपटात मुकेश ऋषी, अंकुर भाटिया, जेन शॉ आणि अभिलाष चौधरी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी सीमावर्ती कारवायांमध्ये सहभागी असलेले लष्करी अधिकारी आणि इतर प्रमुख व्यक्तींचे चित्रण केले आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी ट्रेलरची लांबी आणि संवादांवर टिप्पणी केली, तर काहींनी गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या चित्रणावर लक्ष केंद्रित केले आहे. एका चाहत्याने लिहिले, "मला वाटतं मी संपूर्ण चित्रपटच पाहिला. ज्या चित्रपटांची कथा मोठी असते किंवा जे सिक्वेल असतात, ते वगळता ट्रेलर 4 मिनिटांचेच का असावेत हे मला समजत नाही..." दुसऱ्या युजरने, "GTA 6 च्या आधीच सलमान बिहारी संवाद बोलताना दिसला ..." असे म्हंटले आहे.


गलवानच्या लढाईतील खऱ्या नायकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे मेजर सोइबा मॅनिंगबा यांचे भाऊ असल्याचे सांगणाऱ्या एका प्रेक्षकानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी "मी मेजर सोइबा मॅनिंगबा यांचा भाऊ आहे, जे गलवानच्या लढाईतील खऱ्या नायकांपैकी एक आहेत. आम्हाला त्यांच्या पात्राला अधिक स्क्रीन टाइम मिळेल अशी अपेक्षा होती आणि ज्यांनी या लढाईबद्दल ऐकले आणि पाहिले आहे, त्यांना कळेल की मी काय म्हणत आहे. जय हिंद.." असे म्हंटले आहे.

Comments
Add Comment

Matrubhumi Trailer : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 4 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Matrubhumi Trailer: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर

Ranabaali OTT Release: अवघ्या चार आठवड्यांत 'रणबाली'चा OTT प्रवास सुरू; कधी आणि कुठे पाहाल?

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'रणबाली' या

Amruta Khanvilkar Secrets: अमृता खानविलकरचा मजेशीर खुलासा! आयुष्यातील तीन 'गुन्हे' सांगत अभिनेत्रीने जिंकली मनं

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही आपल्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि दिलखुलास

Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या तिच्या नव्या 'मैत्रेया' (Maitreya)

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदाची दिवाळी झलक; अगस्त्य-आराध्याचा फोटो चर्चेत

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदा हिने बच्चन कुटुंबीयांच्या दिवाळी सोहळ्याचे फोटो शेअर केले. अगस्त्य नंदा आणि आराध्या

Ashok Saraf Lamborghini video: अशोक सराफांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; मामांनी दिलं मजेशीर उत्तर

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि