मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही आपल्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि दिलखुलास स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वातही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा' या गाण्यामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय 'कट्यार काळजात घुसली', 'चंद्रमुखी' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमृता केवळ अभिनयासाठीच नाही, तर तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते. विविध रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. आपल्या कामाचे अपडेट्स, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या मात्र अमृता तिच्या एका मजेशीर वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत असते. चित्रपट, मालिका आणि रिॲलिटी शोच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या अमृता तिच्या एका मजेशीर वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एका यूट्यूब शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने स्वतःच्या आयुष्यातील तीन 'गुन्हे' सांगितले.(AmrutaKhanvilkar)
मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वाने त्यांनी ...
कोणते आहेत अमृताचे तीन गुन्हे?
अभिनेता प्रसाद ओक यांचा मुलगा मयांक ओक याच्या 'Kind of काहीतरी' या यूट्यूब शोमध्ये अमृता सहभागी झाली होती. या शोमध्ये तिला आयुष्यातील तीन गुन्हे सांगण्यास सांगितले. त्यावेळी तिने फळ्यावर तीन गोष्टी लिहिल्या. अमृता म्हणाली, "प्रेमात पडणं हा माझा पहिला गुन्हा आहे. गोड खाणं हा माझा दुसरा गुन्हा आहे आणि तिसरा म्हणजे आळस."
प्रेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
पहिल्या गुन्ह्याबद्दल बोलताना अमृताने मजेशीर अंदाजात सांगितले की, आता पुन्हा प्रेमात पडून त्यातच पडून राहणे नको. तिच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. दुसऱ्या गुन्ह्याबद्दल बोलताना तिने गोड खाण्याची सवय असल्याचे सांगितले. गोड पदार्थ खाणे आपल्याला खूप आवडते आणि ही सवय सुटत नसल्याचेही तिने गंमतीने सांगितले. तर तिसऱ्या गुन्ह्याबद्दल बोलतना तिने आळसाचा उल्लेख केला.(AmrutaKhanvilkarFunRevelation)
व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
मयांक ओकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या शोमधील व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताचा हा मजेशीर अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.