'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि वेगाने वाढणाऱ्या लष्करी क्षमतेने, स्तब्ध झालेला पाकिस्तान आता चीनकडून आधुनिक केजे-५०० एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AEW&C) खरेदी करण्याची योजना आखत आहे.

भारताच्या यशस्वी 'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तानने जबरदस्त धसका घेतला आहे.  या ऑपरेशनने भारताची स्ट्राइक क्षमता आणि त्याची तयारी संपूर्ण जगाला दाखवून दिली. यामुळे आपले हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी पाकिस्तान मित्र देशाकडून सहकार्य मागत सुटला आहे. ज्यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. 

चीनकडून लष्करी सहकार्याची मागणी


पाकिस्तान आता आपले हवाई दल मजबूत करण्यासाठी चीनकडून मदत घेऊ  पाहत आहे. त्याने चीनकडून  आधुनिक रडार सिस्टीम केजे-५०० खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याद्वारे भारताकडे नजर ठेवणे त्यानं शक्य होईल. 

केजे-५०० म्हणजे काय?


केजे-५०० ही एक एईडब्ल्यू अँड सी म्हणजेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे, जी हवाई देखरेख आणि नियंत्रणासाठी वापरली जाते. ती शत्रूच्या हालचाली आगाऊ शोधू शकते. ४७० किमी पर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता केजे-५०० हे सुमारे ४७० किमी पर्यंत शत्रूच्या लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. यामुळे पाकिस्तानला आकाशावर चांगले नियंत्रण मिळेल. एकाच वेळी ६० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची शक्ती ही रडार प्रणाली एकाच वेळी ६० हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि रिअल टाइममध्ये लढाऊ विमानांना कमांड देऊ शकते.

चीन आधीपासून या रडारचा वापर करत आहे


चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) आधीच या रडार प्रणालीचा वापर करत आहे, विशेषतः तैवान आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात याचा वापर केला जात आहे. 

भारतासाठी ही चिंतेची बाब का आहे?


केजे-५०० पाकिस्तानला हवाई क्षेत्रात आघाडी देऊ शकते, ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण अधिक सतर्क राहावे लागेल. त्याची तैनाती संवेदनशील असेल, विशेषतः सीमावर्ती भागात. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनही असहाय्य आहे. अर  केजे-५०० ची किंमत लाखो डॉलर्सची आहे.

पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि कर्जाचा वाढत चाललेला बोजवारा असूनही, पाकड्या आपल्या संरक्षण सौद्यांवर मोठा खर्च करत आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा