दुसऱ्या राज्यात भाषेवरुन मराठी माणसांना मारलं तर ? हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रश्न विचारणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पण व्हायरल होत आहे.

मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारणं चुकीचं असल्याचं हिंदुस्तानी भाऊ याने व्हिडीओतून सांगितले आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. पण मराठी भाषेवरुन राज्यात परराज्यांतून आलेल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. शाळा असो किंवा कॉलेज.. तिथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे, ती लावा. पूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण गरिबांना मारणं चुकीचं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक दुसऱ्या राज्यात शिकायला, नोकरी करायला गेले आहेत. तिथली लोकंही बघतात की आपल्या लोकांना मारलं जातंय. जर त्या लोकांनी तिथे मराठी लोकांसोबत असं केलं, तर आपण काय करणार? एखाद्याला मारणं खूप सोपं असतं, पण एकत्र आणणं खूप अवघड असतं,' असं हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओत म्हणत आहे.

'बाळासाहेबांनंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही हिंदुत्वासाठी बोला. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. पण गोरगरीबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून.. तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करताय. ते पण हिंदूच आहेत. तुमच्यापासून ते लोक लांब जात आहेत. राजकारण करा पण आज तुम्हा राजकारण कोणासोबत करताय? ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान नाही केला, काँग्रेससोबत जाणाऱ्यांशी तुम्ही आज युती करून बसला आहात. जे श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का? हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेनं बघतोय, त्यांचा विश्वास तोडू नका. मनसैनिकांनाही विनंती करतो की, तेसुद्धा हिंदू आहेत, त्यांना नका मारू. आपल्या लोकांना मारू नका;' असंही हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओत म्हणत आहे.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन