बुलढाण्यात वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा अपघात; ३० वारकरी जखमी

पंढरपूर देवदर्शन करून घरी परतत असताना वारकऱ्यांची बस पलटली 


जळगाव: पंढरपूर येथे देवदर्शन करुन घराकडे परतत असताना एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना बुलढाण्यात चिखलीजवळ घडली. या अपघातामध्ये ३० वारकरी जखमी झाले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसून जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


आषाढी वारीनिमित्त विठूरायाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला. ही एसटी बस पंढरपूरवरून खामगावच्या दिशेने जात होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस चिखली शहराजवळ पोहोचली तेव्हा बसला अपघात झाला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बस उलटली.


या एसटी बसमध्ये एकूण ५१ भाविक आणि चालक तसेच वाहक असे एकूण ५३ जण होते. या अपघातामध्ये ३० वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत करत वारकऱ्यांना उपचारासाठी दाखल केलं. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी चिखली आणि बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

'धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको... शिवसेना तुमच्या पाठीशी' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे

गोकुळच्या शासननियुक्त संचालकांच्या मतदानाचा अधिकार कायम; अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग तूर्तास मोकळा झाला

Mumbai Pune Expressway : अटल सेतू ते मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण; प्रवासात 90 मिनिटांपर्यंत बचतीची अपेक्षा

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग

महाराष्ट्रात लिफ्ट सुरक्षेचे नियम कडक; CCTV, विमा आणि मासिक देखभाल अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा

दिवाळीत मच्छीमारांच्या भेटीला जाणार मंत्री नितेश राणे, वर्सोव्यात साधणार संवाद

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार