उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित


नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विजेती ठरलेली कुस्ती खेळाडू रितिका हुडा हिला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ वर्षीय रितिका हूडा हिने ऑलिंपिकमध्ये ७६ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का ठरला आहे.


आशियाई अजिंक्पयद स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीपटूंच्या निवड चाचणीदरम्यान १५ मार्च रोजी उत्तेजक चाचणीही घेण्यात आली. तिच्या 'युरिन' चाचणीदरम्यान प्रतिबंधित पदार्थाचा समावेश असल्याचे समोर आले. यामुळे तिला चार वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



याप्रसंगी रितिका हूडा म्हणाली, अजूनही काहीही निश्‍चित झालेले नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. अधिकाऱ्यांना माझ्याकडून सहकार्य लाभणार आहे. नाडा व कुस्ती संघटनेवर माझा विश्‍वास आहे. यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, असे ती म्हणाली. रितिका हुडा बी नमुना चाचणी करण्याचा विचार करीत आहे. आगामी काळात या नमुना चाचणीचा निकाल येण्याची शक्यता आहे.


रितिका हूडा हिला चार वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे भारताच्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीला धक्का पोहोचला आहे. रितिका हूडा हिच्याकडून भारताला पदक पटकावण्याच्या आशा होत्या. यावर्षी रितिका हिने तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. फक्त एकाच लढतीत ती पराभूत झाली होती. भारताचे भविष्य म्हणून तिच्याकडे बघितले जात आहे.


Comments
Add Comment

रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटणार? पंतप्रधान मोदींच्या एका फोन कॉलने उडाली खळबळ, जगात मोठी चर्चा!

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यातच भारताचे

कर्करोगविरोधी 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू; ग्राहकांची वर्षाला ₹3,540 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' पुरस्कारांची घोषणा; देशातील स्वच्छ शहरांचा होणार गौरव

नवी दिल्ली: देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा आणि जनजागृती वाढवणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या 10 व्या

उत्तराखंडच्या विकासाची झेप! मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते ‘सशक्त नेतृत्व, विकास की ऊँची उड़ान’ पुस्तिकेचे प्रकाशन

[caption id="attachment_1073883" align="aligncenter" width="800"] उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त देहरादून येथील गोरखा मिलिट्री इंटर कॉलेज, गढी

Kolkata Crime: कोलकात्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या; 25 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू, प्रेयसी आणि आईला अटक

कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे

Iran US War Warning : इराणचा अमेरिकेला थेट अल्टिमेटम : 'युद्ध थांबवा, नाहीतर ४८ तासांत...

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) भू-राजकीय संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणचे