ख्रिस्ती धर्मियांकडून आमदार पडळकरांचा निषेध

अकोला: सांगलीत १५ जून रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करण्याचे व जिवे मारण्याचे खुले आवाहन करीत ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करीत, काल शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांना अटक करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ख्रिस्ती समाज शांततेचा पुरस्कार करणारा असून, संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे पालन करणारा आहे. मात्र आमदार पडळकर यांच्या द्वेषमूलक वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरुंच्या जीविताला आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता ख्रिस्ती शिष्टमंडळाने प्रसार माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, संविधानाच्या कलम १४, १५, २५, २६ नुसार प्रत्येक नागरिकाला समानता व धर्मस्वातंत्र्याचे हक्क आहेत. मात्र पडळकर यांचे विधान संविधानाची पायमल्ली करणारे असून, ते समाजात तेढ व हिंसाचाराला चिथावणी देणारे आहे. त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच त्यांची आमदारकीही रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांंमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष, पोलीस अधीक्षक अकोला खासदार, आमदार आदींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी