hdfc bank announcement: HDFC Bank भागभांडवलधारकांसाठी मोठी बातमी ! बँक विशेष Dividend व Bonus Share जाहीर करण्याची शक्यता!

प्रतिनिधी:एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी दिली आहे. बँकेन बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने भागभांडवलधारकांना बोनस शेअर्स व विशेष लाभांश (Special Dividend) याबद्दल आगामी १९ जुलैच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे बँकेने सांगितले. बँकेची आर्थिक परिस्थिती, भागभांडवलधारकांची मान्यता व संचालक मंडळाने आवश्यक त्या परवानग्या या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच यावरील पुढील निर्णय घेतला जाईल असे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


गेल्या १२ महिन्यात बँकेने २२ रूपयांचा प्रति इक्विटी समभाग (Share) जाहीर केला होता. बाजारातील उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने व गुंतवणूकदारांनी चांगला कौल दिल्यामुळे गेल्या एक वर्षात कंपनीचा शेअर्स २३.०१% टक्के वाढला. मागील वर्षी बँकेचा शेअर ११.९४% इयर टू डेट (Year to date YTD) वाढला होता. एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 'बँक एचडीएफसी बँक आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपल्या भागभांडवलधारकांना विशेष अंतरिम लाभांश (Special Interim Dividend) देण्यासाठी विचार करत आहे.' यापूर्वी २०१९ मध्ये बँकेने आपल्या लाभांशसह समभाग विभागणी (Stock Split) केली होती. विशेष म्हणजे, बँकेचे एनपीए (Non Performing Assets NPA) गुणोत्तर ३१ मार्च २०२५ पर्यंत १.३३% टक्क्यांपर्यंत कमी झाला होता जो ३१ डिसेंबर २०२४ रोजी १.४२ टक्के होता. तथापि, तो गेल्या वर्षी १.२४ टक्क्यांवरून वाढला. याशिवाय उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, बँकेचा निव्वळ एनपीए गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ०.४३ टक्के होता, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ०.४६ टक्के आणि आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत ०.३३ टक्के होता.


आज बुधवारी बँकेच्या समभागात ०.३३% वाढ झाल्याने शेअर्सचे मूल्यांकन २००१.७० रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण