भव्य सोलो पोस्टर्सचे अनावरण
बेंगळुरू येथील भव्य कार्यक्रम आणि जागतिक वितरण
बेंगळुरू येथे प्राइम फोकस स्टुडिओज आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या वतीने आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला रणबीर कपूर, साई पल्लवी, रॉकिंग स्टार यश, रवी दुबे, संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासह संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी 'सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट'सोबत महत्त्वाची भागीदारी करण्यात आली आहे.
कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख
या भव्य चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता, रॉकिंग स्टार यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्राइम फोकस स्टुडिओजचे नमित मल्होत्रा, DNEG आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या संयुक्त सहकार्यातून तयार झालेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पहिला भाग: 5 नोव्हेंबर 2026
दुसरा भाग: दिवाळी 2027
हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांसह जगभरात IMAX स्वरूपातही प्रदर्शित केला जाणार आहे.