HDFC Bank Q1 Results : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC चा तिमाही निकाल जाहीर, निव्वळ नफा 'इतका' कोटी Stakeholders साठी बोनस शेअर व Dividend जाहीर

प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळख असलेल्या एचडीएफसी कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेने या तिमाहीत चांगली व संतुलित कामगिरी केली. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) इयर ऑन इयर बेसिसवर (Y oY) निव्वळ नफ्यात मागील वर्षाच्या तिमाहीतील १६१७५ कोटींच्या तुलनेत वाढत या वर्षीच्या तिमाहीत १८१५५ कोटी रुपयावर गेला आहे. तज्ञांनी बँकेच्या नफ्यात १७६५२ कोटींचा नका मिळेल हा दावा खोडत आणखी चांगली कामगिरी केली. याखेरीज बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ५% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत हे उत्पन्न २९८३७ कोटी होते ते वाढत ३१४३८ कोटींवर गेले आहे.

बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) यामध्ये मात्र १.३३% वरून १.४% वर वाढ झाल्याने असेट क्वालिटीत घसरण झाली आहे. निव्वळ एनपीए (Net NPA) मध्येही मागील वर्षाच्या तिमाहीतील ०.४३% तुलनेत वाढ होत ०.४३% वर पोहोचला. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या खर्चात मागील वर्षीच्या तिमाहीतील २३९००.५३ कोटीवरून घसरत ६११५.९४ कोटीवर आले आहे. कंपनीच्या कामकाजातील खर्चात (Operating Expenses) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील १७७८४६.९५ कोटींवरून घसरत ४५३९४.३१ कोटींवर खर्च गेला आहे.

बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) म्हणजेच कामकाजातून मिळणाऱ्या नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील १८८६ कोटींवरून वाढत नफा १९९२ कोटींवर पोहोचला आहे. करपूर्व कमाईत (EBI TDA) मध्ये मात्र मागील वर्षाच्या तिमाहीतील ६५१ कोटीवरून १३.२% घट होत ५६५ कोटींवर गेले आहे. कंपनीच्या निव्वळ नफा (Net Profit) मध्येही मागील वर्षाच्या तिमाहीतील ९८ कोटींच्या तुलनेत घसरण होत ४४.७ कोटींचा नफा मिळाला आहे.

माहितीनुसार, एकूण मालमत्तेच्या (Total Assets) ३.३५% वर कोर निव्वळ व्याज मार्जिन (Core Net Margin) नोंदवले गेले आहे.३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या मागील तिमाहीत ३.४६% होते.एचडीएफसी बँकेने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (मिळवलेले व्याज आणि खर्च केलेले व्याज यांच्यातील फरक) ५.४% वाढून ३१४३९ कोटी झाले आहे, जे ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत २९८३९ कोटी होते.' असे म्हटले.

बँकेने आपल्या भागभांडवलधारकांसाठी बोनस शेअर देखील जाहीर केला आहे. संचालक मंडळाने यासाठी मान्यता दिल्याने प्रत्येक फुल पेड अप (Fully Paid Up) समभागावर १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेला समभाग बँक आपल्या गुंतवणूकदा रांना देणार आहे. याशिवाय बँकेने आपल्या भागभांडवलधारकांसाठी विशेष लाभांश (Special Dividend) देणार आहे. यापूर्वीच बँकेने याबाबत स्पष्ट केले होते. संचालक मंडळाने यासाठी मान्यता दिल्यानंतर आता भागभांडवलधारकांना ५ रूपयांचा विशेष अंत रिम लाभांश मिळणार आहे. 'विशेष अंतरिम लाभांश मिळविण्यास पात्र असलेल्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड तारीख शुक्रवार, २५ जुलै २०२५ आहे. पात्र सदस्यांना विशेष अंतरिम लाभांश सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिला जाईल' असे बँकेने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :